२१ वर्षांचाच वाटतोय; हृतिकच्या फोटोवर सुझान झाली फिदा

हृतिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शर्टलेस फोटो शेअर केला आहे.

hrithik roshan, sussane khan, sussane khan comment, hrithik roshan hot photo,
हृतिकचा हा फोटो जवळपास २० लाख लोकांनी लाइक केला आहे.

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांचा घटस्फोट झाला असला तरी त्यांच्यामध्ये चांगले मैत्रीचे नाते असल्याचे पाहायला मिळते. ते दोघे मुलांसाठी नेहमी एकत्र वेळ घालवताना दिसतात. ते सतत सोशल मीडियावर मुलांसोबत वेळ घालवतानाचे फोटो देखील शेअर करताना दिसतात. आता हृतिकने त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून चर्चेत आहे. या फोटोवर सुझानने कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हृतिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शर्टलेस फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने गळ्यात स्कार्फ, ब्लॅक कॅप आणि सनग्लासेस लावले असल्याचे दिसत आहे. हृतिकच्या या लूकवर अनेकजण फिदा झाले आहेत. चाहत्यांनी त्याच्या या फोटोवर कमेंटचा वर्षाव केला आहे. दरम्यान हृतिकची एक्स वाइफ सुझान खानने देखील कमेंट केली आहे. सुझानच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आणखी वाचा : लग्नाच्या दोन महिन्यांमध्येच सुगंधा आणि संकेतमध्ये झाले भांडण

hrithik roshan, sussane khan, sussane khan comment, hrithik roshan hot photo,

‘तू २१ वर्षांचाच वाटतोय’ असे सुझानने कमेंटमध्ये म्हटले आहे. सुझानसोबतच अनिल कपूर यांनी देखील हृतिकच्या पोस्टवर कमेंट केली आहे. सध्या हृतिकचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. जवळपास २० लाख लोकांनी लाइक केला आहे.

गेल्या वर्षी हृतिकचा ‘वॉर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हृतिकसोबत अभिनेता टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसला होता. त्यांचा हा चित्रपट हिट ठरला होता. आता लवकरच हृतिकचा ‘क्रिश ४’ हा चित्रपट येणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने या चित्रपटाची घोषणा करत टीझर शेअर केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hrithik roshan shares shirtless photo ex wife sussane khan commented avb

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या