अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. ‘अनन्या’ आणि ‘टाईमपास ३’ अशा तिच्या दोन चित्रपटांची घोषणा करण्यात आली. इतकंच नव्हे तर हे दोन्ही चित्रपट एकापाठोपाठ एक प्रदर्शित होणार आहेत. हृताच्या ‘अनन्या’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे. त्याचबरोबरीने या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हृताचा पती प्रतिक शहा देखील भारावला आहे. त्याने आपल्या बायकोसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – Photos : अमृता फडणवीस यांच्या हटके लूकची चर्चा, फोटो पाहून नेटकरी म्हणाले…

प्रतिक आणि हृताने मे महिन्यामध्ये लग्न करत सगळ्यांनाच सुखद धक्का दिला. दोघंही एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करताना दिसतात. तसेच प्रतिक आपल्या बायकोबाबत नेहमीच भरभरुन बोलताना दिसतो. आता देखील ‘अनन्या’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्याने या चित्रपटाचा ट्रेलर नक्की पाहा असं आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे.

प्रतिकची हृतासाठी खास पोस्ट
प्रतिकने हृताबरोबरचा फोटो शेअर करत म्हटलं की, “अनन्या चित्रपटाचा ट्रेलर आता प्रदर्शित झाला आहे. इच्छा, धैर्य, शौर्य, निश्चय आणि एक सामान्य माणसाच्या ताकदी पलिकडीची या चित्रपटाची कथा आहे. खरं तर एका सामान्य मुलीची विलक्षण कथा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे. आताच ट्रेलर पाहा.” ‘अनन्या’चा ट्रेलर पाहून प्रतिक अगदी भारावला आहे.

आणखी वाचा – “आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेचा चमत्कार बघा”; एकनाथ शिंदे गटाच्या याचिकेनंतर किरण मानेंचा संताप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्रेलरमध्ये आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी धडपडणारी, आयुष्य दिलखुलास जगणारी ‘अनन्या’ दिसत आहे. एका अपघातात तिचे दोन्ही हात जातात. मात्र ‘अनन्या’ पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभी राहताना यात दिसत आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले असून ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्माती केली आहे. येत्या २२ जुलैला चित्रपट प्रदर्शित होईल.