छोट्या पडद्यावरील ‘फुलपाखरू’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. हृता सोशल मीडियावर सक्रिय असल्याते दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहते. हृता गेल्या काही दिवसांपासून तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या फोटोवरून तिच्या मेहंदीची चर्चा सुरु झाली आहे.

हृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरून हे फोटो शेअर केले आहे. एका फोटोत हृताने तिच्या मेहंदीचा फोटो शेअर केला आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये ब्रायडल फेशिअलचा फोटो शेअर केला आहे. आता तिचे हे फोटो पाहिल्यानंतर हृताचा लवकरच साखरपुडा होणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Maldhok birds
अग्रलेख: पूतनामावशीचे पर्यावरणप्रेम!
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?

आणखी वाचा : कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला अंकिताचा पती काय काम करतो माहिती आहे का?

हृताने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ती दिग्दर्शक प्रतीक शहासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले आहे. तर प्रतीक हा लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. मुग्धा यांनी अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.

आणखी वाचा : बिग बींचा दाऊद इब्राहिमसोबतचा फोटो व्हायरल? अभिषेकने दिले होते स्पष्टीकरण

मुग्धा यांनी ‘बे दुणे साडे चार’, ‘मिस मॅच’, ‘कर्तव्य’, ‘माहेर माझं पंढरपूर’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. प्रतीक शाह हे नाव छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध नाव आहे. प्रतीकने ‘बेहद २’, ‘एक दिवाना था’ आणि ‘तेरी मेरी एक जिंदणी’ यासारख्या लोकप्रिय मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.