छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. अलिकडेच तो ‘बिग बॉस’च्या १४ व्या सीझनमधून एलिमिनेट झाला. लक्षवेधी बाब म्हणजे या शोमधून बाहेर पडण्यापूर्वी त्याने एका टास्कमध्ये भाग घेतला होता. हा टास्क खेळत असताना त्याने “मला हात लावू नकोस माझ्या घरी माझी गर्लफ्रेंड आहे” अशा शब्दात गौहर खानला सुनावलं होतं. या वाक्यावरुन सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली जात आहे.

पाहा काय म्हणतायेत नेटकरी?

सिद्धार्थ १३ व्या सीझनचा विजेता आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्याला १४ सीझनमध्ये झळकण्याची संधी मिळाली होती. मात्र या संधीचं त्याला सोनं करता आलं नाही. अलिकडेच झालेल्या एका टास्कमध्ये त्याची टीम हरली त्यामुळे नियमानुसार बिग बॉसच्या घरातून तो एलिमिनेट झाला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे त्याच्या टीममध्ये खेळणाऱ्या गौहर खान आणि सना खान यांना देखील बिग बॉसचं घरं सोडावं लागलं आहे.