अभिनेत्री कंगना रणौत सध्या कठीण प्रसंगामधून जाते आहे. अभिनेता ह्रतिक रोशनविरुद्धचा तिचा कायदेशीर लढा सुरू असून, या निमित्ताने सातत्याने नवनव्या घडामोडी घडत आहेत. तिच्या या लढ्यामध्ये आम्ही सतत तिच्या पाठिमागे उभे आहोत, असे तिचे वडील अमरदीप रणौत यांनी म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वीच कंगनाला तिच्या Tanu Weds Manu Returns या चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. नवी दिल्लीमध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी कंगनाचे संपूर्ण कुटुंबीय तिच्यासोबत दिल्लीला गेले होते.
मुलीच्या यशाबद्दल आणि तिच्या आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल अमरदीप रणौत म्हणाले, माझ्या मुलीने चित्रपट क्षेत्रात मिळवलेल्या यशाचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. आयुष्याच्या वाटचालीत प्रत्येक टप्प्यावर तिने धैर्याने परिस्थितीचा सामना केलाय. तिच्या कायदेशीर लढ्यातही आम्ही तिच्यासोबत आहोत.
हृतिकने माझे खासगी फोटो आणि ई-मेल तिस-याच व्यक्तीला पाठवल्याने त्याला अटक करणे हे पोलिसांचे काम असे कंगनाचे म्हणणे आहे. तिच्या वकिलांनीही मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून हृतिक रोशनला अटक करण्याची मागणी केलीये. कंगनाने त्याच्यावर काही खासगी मेल आणि फोटो प्रसिद्ध केल्याचा ठपका ठेवला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th May 2016 रोजी प्रकाशित
‘कायदेशीर लढ्यात मी सदैव कंगनाच्या पाठिशी’
दोन दिवसांपूर्वीच कंगनाला नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
Written by एक्स्प्रेस वृत्तसेवा

First published on: 05-05-2016 at 13:33 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I stand by her in all her legal battles kangana ranauts father