चित्रपटांमधून कामेडी भूमिका साकारणे कधीच बंद करणार नाही. पुढील काळातही अॅडल्ट कॉमेडी करतच राहिन, असे अभिनेता तुषार कपूरने म्हटले आहे. याच महिन्यात तुषार कपूरची विनोदी भूमिका असलेले दोन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्या पैकी एका चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी तुषार दिल्लीमध्ये आला होता. अॅडल्ट कॉमेडीपटातील ‘क्या कूल है हम ३’ प्रदर्शित होतो आहे. त्याचे प्रमोशन सध्या देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरू आहे.
तुषार म्हणाला, मला ज्या भूमिकेमध्ये पाहायला लोकांना आवडते. ते त्याचा मनापासून आनंद घेतात, अशा भूमिका मी का नाकारू. मलाही या भूमिका साकारायला आवडतात. त्यामुळे यापुढील काळातही अॅडल्ट कॉमेडी साकरायला मला आवडेल. यापासून लांब जाण्याचा तूर्ततरी माझा विचार नाही.
‘गोलमाल’पासून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या तुषारने ‘शोर इन द सिटी’ आणि ‘शूटआऊट अॅट लोखंडवाला’ या चित्रपटांमधून चरित्र भूमिकाही साकारल्या होत्या. पुढील काळात अशा वेगळ्या भूमिका कोणी जर माझ्यापुढे आणल्या तर त्यावर मी नक्की विचार करेन. पण साधारणपणे मसालेदार किंवा कामेडी चित्रपट पाहायला लोकांना आवडतात. त्यामुळे मी त्यावर जास्त लक्ष ठेवतो, असे त्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I will never stop doing adult comedies tusshar kapoor
First published on: 21-01-2016 at 10:57 IST