मला सनी लिओनीच्या भूतकाळातील पेशाबद्दल आदर वाटत नाही. तरूणांनी तिच्याकडून प्रेरणा घेऊ नये, असे मत गीतकार प्रसून जोशी याने व्यक्त केले. ‘रंग दे बसंती’ या चित्रपटाला दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रसूनने याबद्दल सांगितले. यावेळी पत्रकारांकडून आमीर खानला सनी लिओनीसंदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा आमीरने मला सनीबरोबर काम करायला आवडेल, असे उत्तर दिले. मात्र, त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रसून जोशीने विचारणा झाली नसतानाही सनी लिओनी आणि तिच्या पॉर्न विश्वातील भूतकाळाविषयी मतप्रदर्शन केले.
प्रत्येक पेशा हा चांगला असेलच असे नसते, त्यामुळे तुम्हाला एखाद्याच्या व्यवसायिक निवडींविषयी भाष्य करण्याचा अधिकार असतो. आपण अनेकदा एखाद्या पेशाची वारेमाप स्तुती करतो. मात्र, आपल्या जीवनाशी संबंध असलेला पेशा समाजासाठी भरीव योगदान देणार असावा. हा पेशा समाजाला सकारात्मक दृष्टी देणारा असावा, असे प्रसून जोशीने या कार्यक्रमादरम्यान सांगितले. मला सनी लिओनीच्या पॉर्न जगतातील भूतकाळाविषयी आदर नसला तरी याचा अर्थ मी तिचा अनादर करतो असे नसल्याचेही प्रसूनने यावेळी स्पष्ट केले. मी तिच्या पेशाचा आदर करत नाही. कुणीही त्याचे अनुकरण करू नये, असे मला वाटते. मात्र, त्यामुळे मी तिचा अनादर करणार नाही. माझी संस्कृती मला तसे करू देणार नाही, असे यावेळी प्रसूनने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jan 2016 रोजी प्रकाशित
‘सनी लिओनीच्या भूतकाळाबद्दल आदर वाटत नाही, तिच्याकडून प्रेरणा घेऊ नये’
प्रसून जोशीने विचारणा झाली नसतानाही सनीच्या पॉर्न विश्वातील भूतकाळाविषयी मतप्रदर्शन केले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 27-01-2016 at 15:37 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I will not praise sunny leone profession and do not want youth to get inspired by it prasoon joshi