इभ्रत या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून जोरदार चर्चा सुरु आहे. कथानकाच्या कॉपीराइटवरुन वाद निर्माण झाला होता. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा अण्णाभाऊ साठे यांच्या ‘आवडी’ या कादंबरीवर आधारली असून त्याच्या कथानकाच्या कॉपीराइटवरुन वाद निर्माण झाला होता. मात्र आता यातून तोडगा निघाला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही निश्चित करण्यात आला आहे.

बदललेल्या तारखेनुसार हा चित्रपट येत्या १३ मार्च २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्रुती वसंत दांडेकर निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रवीण रमेश क्षीरसागर यांनी केलं आहे. ‘इभ्रत’मध्ये संजय शेजवळ,शिल्पा ठाकरे, सुरेश विश्वकर्मा हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायल मिळणार आहेत. तिकीटबारीवर तुफान गाजलेल्या रेडू आणि टकाटक या चित्रपटाचे लेखक संजय नवगिरे यांनी ‘इभ्रत’ या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत.

दरम्यान, ‘इभ्रत’ची कथा अण्णाभाऊ साठे यांची आहे. या चित्रपटाला सुबोध नारकर यांनी संकलित केलं असून अनिल वाथ यांनी या चित्रपटाचं कला दिग्दर्शन केलं आहे. नरेंद्र पंडीत यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. तरल आणि नितळ प्रेमाची गोष्ट सांगणारा इभ्रत २१ फेब्रुवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.