‘राजा नटवरलाल’ या आपल्या आगामी चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱया पाकिस्तानी मॉडेल हुमैमा मलिकने आपण चांगली अभिनेत्री आहोत त्यामुळे बिकनी परिधान लक्ष वेधून घेण्याची गरज वाटत नसल्याचे म्हटले आहे.
पाहा ‘राजा नटवरलाल’चे ट्रेलर
बॉलीवूडचा ‘सिरिअल किसर’ म्हणून ओळख असलेला अभिनेता इमरान हाश्मीसोबत ‘राजा नटवरलाल’मध्ये हुमैमाने चुंबनदृष्ये दिली आहेत मात्र, चित्रपटात बिकनी घालण्याची गरज नसल्याचे विधान हुमैमाने केले. ती म्हणाली की, “मला चित्रपटात बिकनी घालवी लागेल असे वाटत नाही. मी चांगली अभिनेत्री आहे मग, बिकनी घालण्याची गरजच नाही. चित्रपटात कोणतीही रोमॅण्टिक दृष्ये जबरदस्तीने समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. प्रत्येक रोमॅण्टिक दृष्यांना चित्रपटातील प्रसंगानुरूप अर्थ आहे आणि ते समंजसपणे चित्रीत करण्यात आले आहेत की, ज्यांना अश्लीलतेची अजिबात किनार नाही. असेही ती पुढे म्हणाली.
‘मसाला’ चित्रपटांत काम केलेले पत्नीला आवडत नाही- इमरान हाश्मी
तसेच चित्रपटात अभिनेत्रीने दिलेल्या चुंबनदृष्यांच्या आधारावर तिच्या अभिनयाची पारख करणे चुकीचे असल्याचे हुमैमा म्हणाली. इथल्या संस्कृतीत फरक आहे याची कल्पना मला आहे त्यामुळे थोडीफार नर्व्हस होते. परंतु, इमरानसारखा सहकलाकार मिळाल्याने दडपण दूर झाल्याचेही ती म्हणाली.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jul 2014 रोजी प्रकाशित
‘मी चांगली अभिनेत्री, मला बिकनीची गरज नाही’
'राजा नटवरलाल' या आपल्या आगामी चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱया पाकिस्तानी मॉडेल हुमैमा मलिकने आपण चांगली अभिनेत्री आहोत त्यामुळे बिकनी परिधान लक्ष वेधून घेण्याची गरज वाटत नसल्याचे म्हटले आहे.

First published on: 28-07-2014 at 01:16 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If i am good actor dont need bikini humaima malick