बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूजने तिच्या आयुष्यातील काही अनुभव ट्विटरवर शेअर केले आहेत. इलियानाने तिच्या प्रियकरासोबतचे चॅटिंग आणि वॉइस मेसेज सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. तिने एक खुले पत्र लिहले असून ते तिच्या ट्विटर हॅण्डलवर पोस्ट केले आहे.
इलियानाने लिहलेय की, ‘मी माझ्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराचे घाणेरडे मेसेज आणि वॉइस नोट्स लीक करत आहे. कारण त्याने आता माझ्या समोर कोणताच पर्याय सोडलेला नाही. हे पत्र अशा मुलीने लिहिलेय जिला तिचा जुना प्रियकर धमक्या देत आहे.’ काही दिवसांपूर्वीच इलियाना तिच्या एका फोटोमुळे चर्चेत आली होती. तिचा हा फोटो प्रियकर अँड्रयू नीबोन याने कॅमे-यात कैद केला होता. या फोटोमध्ये इलियानाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळला होता. इन्स्टाग्रामवर तिने पोस्ट केलेल्या या फोटोसाठी काहीच कॅप्शन न लिहिता फक्त अँड्रयू नीबोनचे नाव नमूद करत त्यापुढे हृदयाच्या आकाराचे चिन्ह जोडले आहे. इलियानाचा प्रियकर अँड्रयू नीबोन हा स्वत: एक प्रशिक्षित छायाचित्रकार असल्यामुळे त्याने मोठ्या कलात्मकपणे इलियानाचा हा फोटो घेतला होता. तिच्या या फोटोला बरेच लाइक्सही मिळाले होते.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीसुद्धा इलियानाने प्रियकरासोबतच्या सुट्टीचे काही सुरेख फोटो शेअर केले होते. अॅंड्र्यू हा मूळचा ऑस्ट्रेलियाचा राहणारा असून, तो व्यवसायाने फोटोग्राफर आहे. अॅंड्र्यू स्वतः फोटोग्राफरच असल्याने तो इलियानाचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो टिपत असून, यामध्ये तिचे वेगवेगळे मूड टिपण्यातही तो यशस्वी होत आहे.
Absolutely despicable piece of crap!so proud of this girl who exposed this swine! Whoever u r lady #madrespect https://t.co/xTniQ2kPGe
— Ileana D’Cruz (@Ileana_Official) January 31, 2017
दरम्यान, ‘रुस्तम’ या चित्रपटातून झळकल्यानंतर इलियाना फारशी प्रसारमाध्यमांसमोर आली नव्हती. तसेच ‘जुडवा २’ या चित्रपटासाठीसुद्धा तिचे नाव चर्चेत होते. पण, तिने या सर्व चर्चांना अफवा ठरवत पूर्णविराम दिला आहे. सध्या इलियाना तिच्या आगामी ‘बादशाहो’ आणि ‘मुबारकाँ’ या चित्रपटांमध्ये व्यग्र असून ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मॉडेलिंग विश्वातून अभिनय क्षेत्राकडे वळलेली अभिनेत्री इलियाना डिक्रूझ प्रेक्षकांमध्ये तिच्या घायाळ करणाऱ्या अदांसाठी नेहमीच ओळखली जाते. अभिनय कारकिर्दीमध्ये सुरुवातीच्या काळात दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये स्थिरावलेल्या इलियानाने बॉलिवूडमध्येही तिचे वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. स्वत:च्या खासगी आणि व्यवहारी जीवनाविषयी इलियाना कधी कोणतीच गोष्ट लपवून ठेवत नाही.