छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो म्हणून ‘द कपिल शर्मा’ शोकडे आज पहिले जाते. या शोचा सूत्रसंचालक कपिल शर्मा याने त्याच्या विनोदाने अनेकांच्या मनात घर केले आहे. शो मधील कपिल शर्मा आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांचे विनोद चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे. शोमध्ये येणारे कलाकार हे शोला आणखी रंजक करतात. नुकताच 'द कपिल शर्मा शो'मध्ये बॉलिवूडचा दबंग खान सलमानने हजेरी लावली. दरम्यान कृष्णा अभिषेकच्या विनोदावर सलमानला प्रचंड हसू आले आहे. नुकताच 'दबंग ३' चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्मा शोमध्ये पोहचली होती. त्यावेळी प्रभूदेवा, सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान तेथे उपस्थीत होते. दरम्यान कृष्णा प्रभूदेवा जवळ जातो आणि म्हणतो 'चित्रपटात तुमच्यासोबत हे आयोग्य झाले आहे. इतका मोठा चित्रपट आहे. त्यातील गाणीही खूप मोठी आहेत. डान्सर असूनही चित्रपटाच्या गाण्यामध्ये तुम्हाला छोटासा रोल देण्यात आला आहे. त्यावर कपिल शर्मा प्रभूदेवा चित्रपटाचा दिग्दर्शक असल्याचे कृष्णाला सांगतो. View this post on Instagram Khel khel mein hogi bohot masti aur sharaarat #Dabangg3 ke stars ke saath! Dekhiye #TheKapilSharmaShow, iss weekend raat 9:30 baje. @kapilsharma @kikusharda @chandanprabhakar @krushna30 @bharti.laughterqueen @sumonachakravarti @banijayasia @archanapuransingh @beingsalmankhan @aslisona @prabhudevaofficial @arbaazkhanofficial @maheshmanjrekar A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial) on Dec 13, 2019 at 3:05am PST ते ऐकून कृष्णा लगेच 'सलमान पण दिग्दर्शक आहे ना? पण त्याने चित्रपटात अरबाजला देखील भूमिका दिली आहे. मी खरं सांगतो भाऊ-भाऊ असतो, काका-मामा हे फक्त बोलायला असतं' असे म्हणतो. कृष्णाचे बोलणे ऐकून सर्वत्र हास्याची लाट पसरते. सलमान खानला तर हसू अनावर झाल्याचे दिसते.