छोट्या पडद्यावरील इंडियन आयडल १२ हा शो लोकप्रिय रिअॅलिटी शो पैकी एक आहे. इंडियन आयडलच्या आगामी एपिसोडमध्ये ‘फादर्स डे’ विशेष कार्यक्रमातील रंजकतेची पातळी आणखीन वाढणार आहे. या भागात स्पर्धकांचे कुटुंब त्यांच्या लाडक्या मुलांचे मनोबल वाढवण्यासाठी आवर्जून उपस्थित असणार आहेत. या शोचा सुत्रसंचालक आदित्य नारायण स्पर्धकांच्या आई-वडिलांशी चर्चा करून त्यांच्या मुलांबद्दल अनेक गमतीशीर गोष्टी जाणून घेणार आहे.
आणखी वाचा : सलमान आधी ऐश्वर्यावर संजय दत्त झाला होता फिदा, पण या व्यक्तीने दिली होती ताकीद
‘दिलबरो’ या गाण्यावर सायली किशोर कांबळीचा सुंदर परफॉर्मन्सनंतर सेटवर उपस्थित सर्वजण भावुक झाले, विशेषतः सायलीचे वडील- किशोर कांबळी. अलीकडच्या संकट काळात कोव्हिडचे फ्रंटलाइन वर्कर म्हणून अव्याहतपणे काम करणार्या किशोर कांबळी यांचे परीक्षकांनी खूप कौतुक केले. सायलीने आपल्या लहानपणीची एक आठवण सांगितली. ती म्हणाली की “तिचे वडील जे काम करायचे, ते तिला आवडायचे नाही. पण हळूहळू तिने स्वतःला समजावले. तिला ही जाणीव झाली की, तिचे वडील किती परोपकाराचे काम करत आहेत. तिला त्यांच्याबद्दल अपार आदर आणि प्रेम वाटते.”
आणखी वाचा : ‘माझा नवरा पर्फेक्ट आहे पण…’, शिल्पाने केला खुलासा
याविषयी बोलताना सायली म्हणाली, “मी माझ्या वडिलांचा व्यवसाय माझ्या मैत्रिणींपासून लपवायचे कारण त्या सगळ्या तशा डॉक्टर किंवा इंजिनियर यांसारख्या उच्चभ्रू कुटुंबातल्या होत्या. पण कोव्हिडचा उपद्रव सुरू झाल्यानंतर मला हे प्रकर्षाने जाणवले की, माझे वडील एखाद्या सुपरहीरोपेक्षा जराही कमी नाहीयेत. त्यांनी अनेक लोकांचे जीव वाचवले आहेत आणि अनेक रुग्णांची सेवा केली आहे. आज फादर्स डे चे औचित्य साधून मी माझ्या वडिलांचे त्यांच्या उदार, निस्पृह आणि धाडसी सेवेबद्दल आभार मानते. त्यांची मुलगी असल्याचा मला अभिमान वाटतो. मला ही जाणीव आहे की, मी फारशी शहाणी मुलगी नव्हते. पण त्यांनी मात्र नेहमी माझ्यावर निरपेक्ष प्रेमाचा वर्षावच केला आणि मला आधार दिला. मी सदैव त्यांची ऋणी राहीन.”
View this post on Instagram
यावर किशोरजी म्हणाले, “सायली म्हणजे आम्हाला मिळालेले वरदान आहे. तिने आमची सगळी स्वप्ने पूर्ण केली आहेत. तिची प्रतिभा म्हणजे आपल्या कारकिर्दीत ती भविष्यात खूप पुढे जाणार आहे याची साक्ष आहे. मला नेहमीच तिचा अभिमान वाटतो आणि भविष्यातही वाटेल.”
आणखी वाचा : ३२ वर्षांच्या करिअरमध्ये सलमान खान करणार पहिल्यांदाच बायोपिक?
अन्नू मलिक, सोनू कक्कड, हिमेश रेशमिया हे इंडियन आयडलचे परीक्षक आहेत. यावेळी अतिथी परीक्षक म्हणून मनोज मुंतशिर हजेरी लावणार आहेत.