India’s Most Highest Rating Film: सध्या बॉक्स ऑफिसवर सैयारा, सन ऑफ सरदार २, धडक २ असे अनेक बॉलीवूड चित्रपट धुमाकूळ घालत आहेत. पण याच दरम्यान एका अॅनिमेटेड सिनेमाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. फक्त ४ कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. हा सर्वाधिक रेटिंग असलेला भारतीय चित्रपट ठरला आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात कोणीच हिरो नाही. हा क्राइम-थ्रिलर किंवा अॅक्शनपटही नाही.

बऱ्याच वर्षांनी असा चित्रपट रिलीज झाला आहे, ज्याचे सगळे शो हाऊसफुल्ल सुरू आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन ८ दिवस झाले असूनही या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंगही खूपच जोरदार सुरू आहे. या चित्रपटाचे रिव्ह्यू इतके चांगले आहेत की थिएटर्समध्ये प्रेक्षकांची तुफान गर्दी पाहायला मिळतेय.

या मायथोलॉजिकल चित्रपटाचे नाव ‘महावतार नरसिम्हा’ आहे. २ तास १० मिनिटांच्या या अॅनिमेटेड चित्रपटाची कथा जुनीच आहे, पण अॅनिमेशन जबरदस्त आहे. दिग्दर्शक अश्विन कुमार यांचा हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटर्समध्ये आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे.

‘महावतार नरसिम्हा’चे एका आठवड्याचे कलेक्शन

‘महावतार नरसिम्हा’ हा चित्रपट २५ जुलै रोजी थिएटर्समध्ये रिलीज झाला होता. ‘महावतार नरसिम्हा’चे बजेट फक्त ४ कोटी रुपये आहे आणि एका आठवड्यात या चित्रपटाने जगभरात ६२.४० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाला IMDb वर ९.६ रेटिंग मिळाले आहे.

भारताचा पहिल्या क्रमांकाचा सिनेमा

‘महावतार नरसिम्हा’ या चित्रपटाने रेटिंगच्या बाबतीत अनेक भारतीय चित्रपटांना मागे टाकलं आहे. ‘महावतार नरसिम्हा’ हा Top 1 Highest Rated चित्रपट ठरला आहे. याआधी विक्रांत मॅसीच्या ’12th फेल’ला ८.७, ‘गोलमाल’ला ८.५, ‘नयाकन’ला ८.६, ‘अनबे सिवम’ला ८.६, ‘थ्री इडियट्स’ला८.४ व ‘अपूर संसार’ला ८.४ रेटिंग मिळाले आहे.

या सर्व चित्रपटांना मागे टाकत ‘महावतार नरसिम्हा’ एकमेव असा चित्रपट आहे, ज्याला आयएमडीबीवर ९.६ रेटिंग मिळाले आहे. सध्या थिएटर्समध्ये व सोशल मीडियावरही ‘महावतार नरसिम्हा’ या चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे.