बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरचा दिल्ली स्थित मिरा राजपूत हिच्यासोबत झालेला विवाह २०१५ साली बॉलीवूड वर्तुळात सर्वाधिक चर्चा झालेल्या विषयांपैकी एक होता. ७ जुलै रोजी दोघांचा विवाह सोहळा पार पडला. विवाह सोहळ्याची, उपस्थितांची आणि नववधुची छायाचित्रे आपण सोशल मीडियावर पाहिली. पण शाहिदचे लग्न ठरतानाचा एक मजेशिर किस्सा सध्या चर्चेत आहे.
जेव्हा शाहिद मिराच्या वडिलांना पहिल्यांदा भेटायला गेला तेव्हा तो त्याच्या ‘उडता पंजाब’ चित्रपटातील रॉकस्टार लूकमध्ये होता. दिल्लीच्या फार्म हाऊसवर शाहिदची मिराच्या वडिलांसोबत भेट झाली. शाहिद वाढलेले केस, साधं टी-शर्ट आणि हाफ पँटवर होता. त्यावेळी शाहिदचा हा लूक पाहून मिराच्या वडिलांना सुरूवातीला तर धक्काच बसला. पण शाहिदने हा लूक त्याच्या आगामी चित्रपटासाठी केल्याचे त्यांना नंतर समजले.
दिल्लीच्या फार्महाऊसवर शाहिद मिराच्या वडिलांना पहिल्यांदा भेटला तेव्हा तिच्या वडिलांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती, असे शाहिदच्या प्रवक्त्याने सांगितले.
दरम्यान, शाहिद सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. शाहिद उडता पंजाबमध्ये एका पंजाबी रॉकस्टारच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘उडता पंजाब’ची कथा ही अंमली पदार्थांच्या आहारी केलेल्या चार तरुणांची असून शाहिद, आलिया भट, करिना कपूर आणि दिलजित दोसझ हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jun 2016 रोजी प्रकाशित
…यामुळे शाहिद कपूरच्या सासऱयांना बसला धक्का!
शाहिद सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड
Updated:

First published on: 02-06-2016 at 14:55 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interesting trivia that you didnt know about shahid kapoor and his wedding