एका सफाई कर्मचाऱ्याची अत्यंत विलक्षण भावस्पर्शी कथा रेखाटणारा ‘मोऱ्या’ हा मराठी चित्रपट सध्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे. कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळवणारा ‘मोऱ्या’ हा चित्रपट १२ जानेवारी २०२४ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘मोऱ्या’ या चित्रपटाचे लेखन – दिग्दर्शन जितेंद्र बर्डे यांनी केले असून त्यांनी यात मध्यवर्ती भूमिकाही केली आहे. या चित्रपटाला ‘सोहोवाला कोर्ट हाऊस हॉटेल सिनेमा’ या लंडनच्या प्रसिद्ध चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याचा पहिला बहुमान मिळाला आहे.
‘कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’बरोबरच ‘एलएचआयएफएफ बार्सिलोना, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’, ‘खजुराहो आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव’, ‘पेनझान्स आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव’, ‘लेक सिटी इंटरनॅशनल चित्रपट महोत्सव’, ‘बॉलीवूड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ आदी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवात ‘मोऱ्या’ या चित्रपटाने ‘उत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळविला आहे. आता लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. .‘टॉर्टुगा मोशन पिक्चर्स’ निर्मित ‘मोऱ्या’ या चित्रपटात उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, राहुल रोकडे, सुरज अहिवळे, रुद्रम बर्डे, कुणाल पुणेकर, शिवाजी गायकवाड, दीपक जाधव, विजय चौधरी, अविनाश पोळ, रुपाली गायके आणि जितेंद्र पुंडलिक बर्डे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.