४२ वर्षांची शमिता शेट्टी पडली राकेश बापटच्या प्रेमात?

सध्या सोशल मीडियावर त्या दोघांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Raqesh Bapat,Shamita Shetty,Shilpa Shetty,Bigg Boss OTT,
सध्या त्यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

बिग बॉस हा कायमच चर्चेत असणारा आणि तितकाच वादग्रस्त शो आहे. या शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक देखील कायम चर्चेत असतात. सध्या बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरचा ‘बिग बॉस ओटीटी’ हा शो चर्चेत असते. या शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी सहभागी झाली आहे. तसेच शमिता आणि बिग बॉस ओटीटीचा स्पर्धक राकेश बापट सध्या चर्चेत आहेत. शमिता राकेशच्या प्रेमात पडल्याचे म्हटले जात आहे.

शमिता ही सध्या बिग बॉस ओटीटीच्या घरातील स्पर्धक राकेश बापटसोबत वेळ घालवताना दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ते दोघे प्रेमात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी त्यांचे बिग बॉसच्या घरातील एकत्र वेळ घालवतानाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. हे व्हिडीओ सध्या चर्चेत आहेत.

आणखी वाचा : “बिग बॉस ओटीटीच्या घरात तर सेक्सही…”; स्पर्धकानेच केला होता गौप्यस्फोट

बिग बॉस ओटीटीच्या घरात राकेश शमितासोबत फ्लर्ट करताना दिसतो. तसेच बऱ्याचदा शमिता त्याला जेवण भरवताना देखील दिसते. ते एकमेकांचा हात पकडून बसलेले दिसतात. त्यामुळे काही नेटकऱ्यांनी शमिता आणि राकेश प्रेमात असल्याचे म्हटले आहे.

एका नेटकऱ्याने ट्विटरवर शमिता आणि राकेशचा व्हिडीओ शेअर करत ‘त्यांच्यामधील नाते आणखी घट्ट झाले आहे. कोणाचीही नजर ना लागो’ असे म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Is 42 years old shamita shetty in love with raqesh bapat avb

ताज्या बातम्या