बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिचा फिटनेस आणि फॅशन स्टाइल यांमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. ४८ वर्षीय मलायका फिटनेस आणि फॅशनच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींनाही टक्कर देताना दिसते. नुकतीच तिने Famina miss india finele 2022 मध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमासाठी मलायकानं ट्रान्सपरंट ड्रेस घातला होता आणि या ड्रेससोबत तिने साधा चोकर नेकलेस घातला होता. या नेकलेसवर नेटकऱ्यांच्या धम्माल प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

मिस इंडिया इव्हेंटसाठी मलायकानं गोल्डन रंगाचा ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केला होता. या ड्रेससोबत मलायकानं लाइट मेकअप केला होता. तसेच गळ्यात एक नेकपीस घालून त्याला क्लासी लुक दिला आणि केस मोकळे सोडले होते. या संपूर्ण लुकमध्ये ती खूपच सुंदर आणि कॉन्फिडन्ट दिसत होती. पण या सगळ्यात मलायकाच्या नेकलेसनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं. तिच्या या नेकलेसची तुलना सलमान खानच्या ब्रेसलेटशी केली जात आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्सनी यावरुन धम्माल कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा- Miss India Finale साठी ट्रान्सपरंट ड्रेस घालणं मलायकाला पडलं महागात

मलायका अरोरानं या ड्रेससोबत गळ्यात जो मिडल स्टोन गोल्डन नेकलेस घातला आहे तो हुबेहूब सलमान खानच्या हातात नेहमीच असणाऱ्या ब्रेसलेटसारखा दिसत आहे. अनेकांना तिचा हा नेकलेस पाहून सलमानच्या ब्रेसलेटची आठवण झाली. एका युजरनं मलायकाच्या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं, “हे सलमान खानचं ब्रेसलेट हिच्या गळ्यात काय करत आहे. चुकून त्याच्या घरातून आणलं होतं का?” तर दुसऱ्या एका युजरनं आपल्या कमेंटमध्ये म्हटलंय, “सलमानचं ब्रेसलेट नेकलेस म्हणून घातलंय”

दरम्या या संपूर्ण इव्हेंटमध्ये मलायकानं आपल्या लुकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अनेकांनी तिच्या या लुकचं कौतुक केलं तर काहींना मात्र तिचा हा लुक अजिबात आवडलेला नाही आणि त्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. काहींनी तिला ‘स्वस्तातली केंडल जेनर’ म्हटलंय तर काहींनी तिला चक्क ‘म्हतारी’ असं देखील म्हटलं आहे.