‘मेट गाला २०२३’ (Met Gala 2023) या प्रतिष्ठित फॅशन इव्हेंटची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या फॅशन इव्हेंटची न्यू यॉर्कमध्ये सुरुवात झाली. या इव्हेंटमध्ये हॉलीवूडपासून बॉलीवूडपर्यंतच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. तर यात ईशा अंबानीनेही हजेरी लावली. या कार्यक्रमातील तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याचबरोबर चर्चा झाली ती तिच्या हातात दिसणाऱ्या छोट्याशा क्लचची. आता या क्लचची किंमत किती आहे हे समोर आले आहे.

ईशाने काळ्या रंगाचा साडी गाऊन घातला होता. या गाऊनला हजारो हिरे आणि मोत्यांनी सजविण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर पदम गुरंग यांनी ईशाचा हा सुंदर ड्रेस डिझाइन केला होता. या गाऊनबरोबरच तिने एक छोटा क्लच हातात घेतला होता. बाहुलीसारखा दिसणारा हा क्लच सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!

आणखी वाचा : अंबानींचा शाही थाट! कार्यक्रमाला उपस्थित सर्व पाहुण्यांना चांदीच्या ताटातून जेवण अन् मेन्यूही होता खास

ईशा अंबानीने ‘मेट गाला २०२३’मध्ये येताना काळ्या रंगाची छोटी पर्स हातात पकडली होती. ही पर्स बाहुलीसारखी दिसत होती. अत्यंत हटके दिसणाऱ्या या पर्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ईशाच्या हातात दिसणारी ही पर्स थोडीथोडकी नाही तर तब्बल २५ लाखांची असल्याचे बोलले जात आहे. आता सोशल मीडियावर नेटकरी या पर्सच्या किमतीबद्दल चर्चा करीत आहेत.

हेही वाचा : पतीबरोबर डिनर डेटला जाताना ईशा अंबानीने घातलेल्या चपलांची किंमत आली समोर; आकडा वाचून व्हाल थक्क

ईशाव्यतिरिक्त या फॅशन इव्हेंटमध्ये अभिनेत्री आलिया भट्टने डेब्यू केला आहे. तर देसी गर्ल प्रियांका चोप्रानेही पती निक जोनसबरोबर या कार्यक्रमात हजेरी लावली होती. आता या कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्टार्सचे फोटो व्हायरल होत आहेत.