बऱ्याच वेळा अनेक कलाकार त्यांच्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधत असतात. नुकताच ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया उर्फ ईशा केसकरने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधला आहे. दरम्यान ईशाला ती डेट करत असलेल्या अभिनेत्याला पहिल्यांदा कुठे भेटली, लग्न कधी करणार असे अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत.
ईशाने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावरुन ‘Ask me anything’ या फिचरद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. तिने ‘पूछ ना!’ असे लिहित इन्स्टावर स्टोरी पोस्ट केली होती. त्यानंतर तिच्या या स्टोरीला चाहत्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यामध्ये चाहत्यांनी ईशा डेट करत असलेला अभिनेता ऋषी सक्सेनाला पहिल्यांदा कुठे भेटली, त्यांच्या नात्याला किती वर्षे झाली, आवडती स्विट डीश कोणती, लग्नाबाबत काय विचार आहे? असे अनेक प्रश्न विचारण्यात आले होता. त्यावर ईशाने ऋषी आणि तिची पहिली भेट ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर झाल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या नात्याला २९ जुलै रोजी दोन वर्ष पूर्ण होणार असल्याचे देखीस सांगितले.
एका चाहत्याने लग्न कधी करणार हा प्रश्न विचारताच ‘लवकर नाही’ असे उत्तर तिने दिले आहे. दरम्यान ईशाला तिची आवडती स्विट डीश कोणती असा प्रश्न देखील विचारण्यात आला होता. त्यावर ईशाने ऋषी सक्सेनाचा फोटो पोस्ट करत ‘हा आणि सगळं स्वीट’ असा रिप्लाय दिला आहे. ईशाच्या या संवादामुळे चाहते आनंदी झाले आहेत.
सध्या ईशा ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत शनायाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तसेच उपेंद्र सिधये यांच्या ‘गर्लफेंड’ या चित्रपटात ती दिसणार असल्याचे तिने सांगितले आहे.