बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही नेहमीच कोणत्या ना कारणामुळे चर्चेत असते. उर्मिलाने तिच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने तिच्या कारकिर्दीत बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक चित्रपटात काम केले आहे. २०१६मध्ये तिने मॉडेल मोहसिन अख्तरशी लग्न करत चाहत्यांना सुखद धक्काच दिला. त्यानंतर आता उर्मिला आई कधी होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. एका मुलाखतीमध्ये उर्मिलाने यावर वक्तव्य देखील केले आहे.

उर्मिलाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये खासगी आयुष्यावर भाष्य केले आहे. तिने अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. त्यावेळी तिला आई होण्याचा विचार करत आहे का? किंवा एखाद्या बाळाला दत्तक घेणार आहेस का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उर्मिलाने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
‘या’ मराठमोळ्या अभिनेत्यासोबत रिंकू राजगुरु गेली डिनर डेटवर, अफेअरच्या चर्चांना उधाण

या गोष्टींचा फार कधी विचार केला नाही. हो आणि नाही पण. जेव्हा या गोष्टी व्हायच्या असतील तेव्हा त्या होतातच असे उर्मिला म्हणाली. पुढे ती म्हणाली, प्रत्येक स्त्रीने आई व्हावे असे काही नसते. ते योग्यवेळी आयुष्यात येतच. मला लहान मुले प्रचंड आवडतात. जगात अशी अनेक मुलं आहेत ज्यांना मायेची, प्रेमाची गरज आहे. मी बाळाला जन्म देतेय की नाही हे महत्त्वाचे नाहीये असे उर्मिला पुढे म्हणाली.

उर्मिला मातोंडकर सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. तिने बॉलिवूडकडे पाठ फिरवत राजकारणात प्रवेश घेतला असला तरी अनेक गाजलेल्या चित्रपटात काम केले आहे. त्यासोबत तिने अनेक मोठ्या कलाकारांसोबतही स्क्रीनही शेअर केली आहे. मात्र एकेकाळी उर्मिला मातोंडकरला घराणेशाहीचा सामना करावा लागला होता.