‘अझर’मधील ‘इतनी सी बात’ गाण्यात रिअल लाइफ लोकेशन्स

‘इतनी सी बात’ गाणे चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

इमरान हाश्मी आणि प्राची देसाई

Itni Si Baat‘अझर’ या आगामी चित्रपटात इमरान हाश्मी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीनच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर प्राची देसाई अझरची पत्नी नौरीनची व्यक्तिरेखा साकारत आहे. इमरान हाश्मी आणि प्राची देसाई या जोडीचे ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ चित्रपटातील ‘पी लूं’ गाणे चांगलेच हीट झाले होते. आता ‘अझर’ चित्रपटातील त्यांचे ‘इतनी सी बात’ गाणे आले असून, ते देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरत असल्याचे दिसत आहे. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे, हैदराबादमधील रियल लाइफ लोकेशनवर गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. चित्रपटातील अझर आणि नौरीनचा रोमान्स आणि प्रेम ‘इतनी सी बात’ गाण्यात अतिशय उत्तमपणे दर्शविण्यात आला आहे.

गाण्याचा व्हिडिओ

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Itni si baat hain song from azhar

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती