नव्वदच्या दशकात तमाम चाहत्यांवर आपल्या रुपाची ‘मोहिनी’ घालणारी मोहिनी आता नव्या रुपात परत येतेय. एव्हाना ही बाब तुमच्या लक्षात आली असेलच. तेजाब चित्रपटातलं सर्वात गाजलेलं ‘एक, दोन, तीन’ हे गाणं ‘बागी २’ या चित्रपटात नव्या अंदाजात सादर करण्यात येणार आहे.
बागी २ मध्ये जॅकलिन ‘एक, दोन, तीन’ या गाण्यावर आयटम नंबर करणार आहे. या गाण्यातील जॅकलिनचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. तेजाब चित्रपटातल्या या सर्वात गाजलेल्या गाण्यावर माधुरीनं नृत्य केलं होतं. हे गाणं आणि माधुरीचा डान्स त्यावेळी तुफान गाजला होता. टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात हे गाणं रिक्रिएट करण्यात आलं आहे. या महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
सलमानमुळे चित्रपटसृष्टीत आलेल्या ‘या’ अभिनेत्याला राधिकाने दिला मोलाचा सल्ला
…म्हणून प्रिया वारियर मोबाइल वापरत नाही
अहमद खान आणि गणेश आचार्यनं नव्या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन केलं आहे. हे गाणं माधुरीला समर्पित असेल असं दोघांनी म्हटलं आहे. खरं तर माधुरीच्या करिअरमध्ये हे गाणं आणि चित्रपटसुद्धा मैलाचा दगड ठरला आहे. बागी २ मध्ये हे गाणं रिक्रिएट करण्याचा प्रयत्न आम्ही केला पण माधुरीनं जे नृत्य सादर केलं त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही याची प्रांजळ कबुलीही सगळ्यांनी दिली आहे. ३० मार्चला रुपेरी पडद्यावर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
A forever-favourite!! The countdown begins #EkDoTeen @iTIGERSHROFF @DishPatani @khan_ahmedasas @NGEMovies @FoxStarHindi @tseries #Baaghi2 #GaneshMasterji pic.twitter.com/bkbS4uquaJ
— Jacqueline Fernandez (@Asli_Jacqueline) March 16, 2018
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.