गेली १८ वर्षे सतत नाविन्यपूर्ण मनोरंजनाने जगभरातील मराठी प्रेक्षकांना झी मराठी वाहिनीने भुरळ पाडली आहे. मराठी दूरचित्रवाणी क्षेत्रातील पहिली दैनंदिन मालिका ‘आभाळमाया’ असो वा मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा ‘झी गौरव पुरस्कार’ असो, किंवा जग पादाक्रांत करणारा ‘चला हवा येऊ द्या’ सारखा धमाल कार्यक्रम असो झी मराठी वाहिनीने प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन केले. धकाधकीच्या जीवनात जेवढी दगदग वाढतेय तेवढीच ही मनो रंजनाची भूक वाढत चालली आहे. रसिकांची हीच गरज लक्षात घेऊन झी मराठीने संध्याकाळी मनोरंजनाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

VIDEO: ..अन् मानुषीने ‘मिस वर्ल्ड’चा मुकुट उतरवला

येत्या २७ नोव्हेंबरपासून दुपारी १ वाजता प्रक्षेपित होणारी ‘जाडूबाई जोरात’ ही मालिका संध्याकाळी ६ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. दररोज संध्याकाळी ६.३० वाजता होम मिनिस्टरपासून सुरु होणाऱ्या या मनोरंजनाच्या यात्रेचा शुभारंभ आता संध्याकाळी ६ वाजल्यापासून ‘जाडूबाई’ अगदी जोरात करतील. निर्मिती सावंत आणि किशोरी शहाणे अशा दोन दिग्गज अभिनेत्रीच्या अभिनयाची जुगलबंदी सध्या चांगलीच रंगात आली आहे. मालिकेने सुरुवातीपासूनच रसिकांच्या मनाची पकड घेतली होती. नव्या वेळेत मालिकेची हीच पकड आता अधिक घट्ट होईल, अशी आशा मालिकेची टीम व्यक्त करत आहे.

VIDEO : अप्सरा आली..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जाडूबाईने जरी डाएटचा मार्ग स्वीकारला असला तरी प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा हा खुराक कधीही कमी होणार नाही, याची पुरेपूर काळजी वाहिनीने घेतली आहे.