तामिळ सुपरस्टार सूर्याचा ‘जम भीम’ हा चित्रपट २ नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शनापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दरम्यान, पट्टाली मक्कल काटची (पीएमके) या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने सुर्यावर हल्ला करणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आता सूर्याची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

सूर्याच्या चेन्नईत असलेल्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. पीएमकेचे पदाधिकारी सीतामल्ली पलानीसामी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘जय भीम’ हा चित्रपट वन्नियार समाजाच्या चित्रणामुळे वादात सापडला आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सूर्याच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचवेळी व्हीसीकेचे प्रमुख थोल तिरुमवालवन यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “जेव्हा जेव्हा पीएमके आपला राजकीय आधार गमावतो तेव्हा ते वाद निर्माण करतात. ते सूर्याला धमकवत नाहीत, ते लोकशाही आणि संविधानाला धोका आहेत. तामिळनाडूतील सर्व लोकशाही शक्ती पीएमकेला विरोध करत आहेत. अशा समाजकंटकांवर पोलिसांनी कारवाई करावी.”

आणखी वाचा : बिग बॉस मराठी ३ : मीरा आणि सोनालीमध्ये झाली हाणामारी?

यापूर्वी पलानीसामी म्हणाले होते की, ‘जय भीम’मध्ये वन्नियार समुदायाला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. मयिलादुथुराई जिल्ह्यात चित्रपट प्रदर्शित न करण्याची धमकीही त्यांनी दिली होती. पोलिसांचे म्हणणे आहे की सूर्यावा मिळालेल्या धमक्यांबद्दल सोशल मीडियाच्या वृत्तांची दखल घेत, मायलादुथुराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा : आई बंगाली आणि वडील जर्मन मग मुस्लीम आडनाव का लावते दिया मिर्झा?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जय भीम चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. चित्रपट एकापाठोपाठ रेकॉर्ड बनवत आहे. हा चित्रपट तामिळ भाषेत असला तरी सुद्धा हिंदीत या चित्रपटाला जास्त पसंती मिळाली आहे.