बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकताच जान्हवीने ‘वॉट वुमन वॉन्ट’ या करिना कपूर खानच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये जान्हवीने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. दरम्यान ती एकदा वडिलांशी, बोनी कपूर यांच्याशी खोटे बोलून लॉस वेगसला गेल्याचा खुलासा तिने शोमध्ये केला आहे.
करिनाने शोमध्ये जान्हवीला विचारले की, ‘अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्या आई-वडिलांसोबत शेअर करायला हवी आणि अशी कोणती गोष्ट जी अजिबात सांगायला नको?’
View this post on Instagram
त्यावर जान्हवीने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘मला असे वाटते की आपल्या रिलेशनशीपबद्दल आपल्या आई-वडिलांशी आपण मनमोकळेपणाने बोलायला हवे. कारण प्रत्येक तरुणाच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा भाग असतो आणि एक गोष्टी जी अजिबात सांगायला नको ती म्हणजे तुमच्या लहानपणीचे किंवा तुमच्या कॉलेज आयुष्यातील गोष्टी ज्यांमुळे समस्या निर्माण होतील’ असे जान्हवीने म्हटले.
नोराचा सेक्सी डान्सपाहून आईने फेकून मारली चप्पल, व्हिडीओ पुन्हा चर्चेत
पुढे जान्हवी म्हणाली की, मी काल पहिल्यांदा बाबांना म्हटले की मी तुमच्याशी खोटं बोलले आहे. मी त्यांच्याशी एकदा खोटं बोलले होते की मी चित्रपट पाहायला जाते. पण मी चित्रपट पाहायला न जाता फ्लाइट पकडून लॉस वेगसला गेले होते. मी तेथे फिरले आणि सकाळी फ्लाइट पकडून घरी आले. त्यांना ही गोष्ट कळाली देखील नाही.
Video: जया बच्चन रॉक्स! ‘पल्लो लटके’ गाण्यावर श्वेता बच्चनसोबत केला डान्स
या गोष्टींना मी प्रोत्साहन देणार नाही. पण आयुष्यात मजा ही केली पाहिजे पण एका मर्यादेपर्यंत असं ती पुढे म्हणाली.