बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. तिचे लूक सोशल मीडियावर व्हायरल होतात. जान्हवीला फॅशनसोबतच पार्टी करण्याची देखील खूप आवड आहे. ती अनेकदा तिच्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसते. अलीकडेच पुन्हा एकदा जान्हवी कपूर तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी करताना दिसली. यावेळचा तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जान्हवी कपूरला तिचा कथित बॉयफ्रेंड ओरहान अवत्रामणीसोबत पार्टी केल्यानंतर एका रेस्तराँच्या बाहेर दिसली. नेहमी गोड स्माइल देऊन पापराझीचं स्वागत करणारी जान्हवी यावेळी जरा अस्वस्थ दिसली. ती पापराझींशी न बोलता थेट तिच्या कारमध्ये जाऊन बसली आणि निघून गेली. तर, दुसरीकडे, ओरहान मात्र रेस्तराँच्या गेटवर उभा राहून “जान्हवी निघून गेली” असं म्हणताना दिसला.

जान्हवी कपूरचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत असून सोशल मीडिया यूजर्स जान्हवीचा मूड एकदम ऑफ दिसत असल्याची चर्चा करत आहेत. यासोबतच पार्टीत जान्हवी कपूर आणि तिचा कथित बॉयफ्रेंड यांच्यात भांडण झालं असावं, त्यामुळे ती रागात दिसत आहे, असा अंदाजही युजर्स बांधत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.