बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. बऱ्याचवेळा ती ट्रोल देखील होते. काही दिवसांपूर्वी कंगनाने १९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य ही भीक मिळाली आहे, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे कंगनाला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. यावेळी कंगनाला फक्त नेटकरी नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटीही ट्रोल करत आहेत. यात बॉलिवूडचे लोकप्रिय गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी ही तिला ट्रोल केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जावेद यांनी ट्वीट करत कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी कंगनाचं नाव घेतलं नाही, पण त्यांच्या ट्वीटमधून हे स्पष्टपणे कळते की हे ट्वीट त्यांनी कंगनाच्या वक्तव्यावर केले आहे. “ज्यांचा स्वातंत्र्य चळवळीशी काहीही संबंध नव्हता अशा सगळ्यांना जेव्हा काही लोक आपल्या स्वातंत्र्याला ‘भीक’ म्हटलं तर वाईट का वाटतं?”, असे जावेद ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

आणखी वाचा : अनुष्का शेट्टीसोबत नागा चैतन्यच्या साखरपुड्याची बातमी ऐकूण नागार्जुन यांना बसला होता धक्का

आणखी वाचा : आई बंगाली आणि वडील जर्मन मग मुस्लीम आडनाव का लावते दिया मिर्झा?

दरम्यान, एका मुलाखतीत “देशाला १९४८ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे स्वांतत्र्य नसून ती भीक होती. आपल्याला खरे स्वातंत्र्य हे २०१४ मध्ये मिळाले. देशात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, त्यावेळी मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. मी आता राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करते. सैन्यदलाबद्दल बोलते किंवा आपल्या संस्कृतीच्या प्रचाराबद्दल काम करते. पण त्यावेळी लोक मला मी भाजपचा अजेंडा चालवत आहे, असे सांगतात. तसेच या मुद्द्यावरुन मला भाजपसोबत जोडलं जाते. पण हे सर्व मुद्दे भाजपचे कसे काय होऊ शकतात? हे तर देशाचे मुद्दे आहेत,” असे कंगना म्हणाली होती. याच कारणामुळे कंगनाला ट्रोल केलं जातं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Javed akhtar reacts on kangana ranaut bheekh remark on our freedom movement dcp
First published on: 19-11-2021 at 09:55 IST