Javed Akhtar on Hijab Row : कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुस्लीम विद्यार्थ्यांच्या हिजाब घालण्यावरून वाद अद्याप सुरूच आहे. कर्नाटकात सुरू असलेला हिजाब वादाचा मुद्दा आता देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यानंतर सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकाराही यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी नुकतंच कर्नाटकातील महाविद्यालयांमध्ये हिजाबच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

जावेद अख्तर यांनी कर्नाटकात घडलेल्या या घटनेवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवर याबाबत एक ट्विट केले आहे. त्यावर ते म्हणाले, “मी आतापर्यंत कधीही हिजाब किंवा बुरखा याची बाजू घेतलेली नाही. मी आजही त्यावर ठाम आहे. पण त्याचवेळी मुलींच्या एका छोट्या गटाला घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडांच्या टोळीचा मी निषेध करतो. हा पुरुषार्थ आहे का? हे खेदजनक गोष्ट आहे.”

दरम्यान या घटनेनंतर कमल हसन, रिचा चढ्ढा यांनी आंदोलकांवर मुलींची छेडछाड केल्याबद्दल टीका केली होती. त्यानंतर आता जावेद अख्तर यांनी ट्विट करून या घटनेचा निषेध केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

कर्नाटकातील उडुपी येथील एका महाविद्यालयात सहा मुलींना महाविद्यालयीन गणवेश परिधान न करता हिजाब परिधान केल्यामुळे त्यांना वर्गात जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. यानंतर या मुलींनी आंदोलन केले होते. कॉलेजला न जुमानता त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. त्यानंतर हा वाद कर्नाटकातील अनेक कॉलेजांमध्ये सुरु झाला.

Hijab Row : मुंबईतही महाविद्यालयामध्ये हिजाब घालण्यावर बंदी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान कर्नाटकातील उडुपी कॉलेजमध्ये हिजाब परिधान केल्याच्या घटनेने सुरू झालेल्या वादाचे देशभरात पडसाद उमटत आहेत. अनेक विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यावरून आंदोलनं करताना दिसत आहे. हिजाबच्या विरोधात काही विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली होती. आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आहे. शैक्षणिक संस्थांमधील हिजाबवरील बंदी प्रकरण बुधवारी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या व्यापक खंडपीठाकडे प्रविष्ट करण्यात आल़े आहे. त्यावर आज, गुरुवारी सुनावणी होणार आहे.