दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नव्या दमाच्या सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक म्हणून अ‍ॅटलीला ओळखले जाते. दिग्दर्शक अ‍ॅटली ‘जवान’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असून यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे. २०१४ मध्ये अ‍ॅटलीने अभिनेत्री कृष्णा प्रियासोबत लग्नगाठ बांधली. अ‍ॅटली आणि प्रियाने ३१ जानेवारी २०२३ रोजी गोंडस बाळाला जन्म दिला. या बाळाची पहिली झलक अ‍ॅटलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.

अ‍ॅटली आणि प्रियाचे चाहते छोट्या राजकुमाराची झलक पाहण्यासाठी एवढे दिवस उत्सुक होते. आता अभिनेत्री प्रिया व अ‍ॅटलीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून बाळाची पहिली झलक शेअर करत आपल्या चाहत्यांची मागणी पूर्ण केली आहे. या जोडप्याने बाळासह मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेतले. मात्र, हा फोटो शेअर करताना त्यांनी बाळाच्या चेहऱ्यावर हार्ट इमोजी लावत, चेहरा लपवला आहे.

हेही वाचा : १५ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली; ‘तारक मेहता…’ मालिकेतील टप्पू करणार सोनूला प्रपोझ? काय असेल भिडे गुरुजींची रिअ‍ॅक्शन

फोटो शेअर करीत या जोडप्याने बाळाचे नाव सुद्धा जाहीर केले आहे. अ‍ॅटली आणि प्रियाने आपल्या बाळाच्या नाव ‘मीर’ असे ठेवले आहे. या फोटोला अवघ्या काही तासात हजारो लाईक्स मिळाले असून चाहत्यांनी कमेंट्समध्ये शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : ‘नयनतारा’बद्दल एका शब्दात काय सांगशील? शाहरुख म्हणाला, “ती अतिशय…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अ‍ॅटली हा तामिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. तामिळनाडूतील मदुराईमध्ये अ‍ॅटलीचा जन्म २१ सप्टेंबर १९८६ रोजी झाला त्याचे पूर्ण नाव ‘अरुण कुमार’ असे आहे. ‘जवान’ या चित्रपटाच्या निमित्ताने ‘अ‍ॅटली’ बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असून हा सिनेमा ७ सप्टेंबर २०२३ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.