लग्नानंतर वर्षभरातच शाहिदपासून वेगळं होण्याच्या विचारात होती पत्नी मीरा, एका गैरसमजामुळे…

शाहिद कपूरनं एका मुलाखतीत पत्नी मीराबाबत मोठा खुलासा केला.

लग्नानंतर वर्षभरातच शाहिदपासून वेगळं होण्याच्या विचारात होती पत्नी मीरा, एका गैरसमजामुळे…
एका मुलाखतीत शाहिदनं त्याच्या खासगी आयुष्याबद्दल काही खुलासे केले होते.

शाहिद कपूरचा बहुचर्चित ‘जर्सी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर बराच चर्चेत राहिला होता. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत शाहिदनं त्याच्या खासगी आयुष्याबद्दल काही खुलासे केले होते. यासोबतच त्यानं त्याच्या वैवाहीक आयुष्याबाबत एक सीक्रेटही शेअर केलं होतं.

एका मुलाखतीत शाहिदने सांगितलं, ‘मीराने २०१५ मध्ये लग्नानंतर वर्षभरातच ‘उडता पंजाब’ चित्रपट पाहिल्यानंतर माझ्यापासून दूर राहण्याचा विचार केला होता.’ या चित्रपटात शाहिदनं रॉकस्टारची भूमिका साकारली होती. ज्याला ड्रगचं व्यसन आहे. एका मुलाखतीत शाहिदनं सांगितलं, ‘मी तिला हा चित्रपट पाहण्यास सांगितलं होतं. चित्रपट पाहताना ती माझ्या बाजूला बसली होती आणि नंतर अचानक ती माझ्यापासून दूर झाली आणि दुसऱ्या बाजूला जाऊन बसली.’

आणखी वाचा- “जे इस्लाम मानत नाहीत त्यांना…”, ‘हलाल मीट’ वादावर गायक लकी अली यांची प्रतिक्रिया चर्चेत

शाहिद पुढे म्हणाला, ‘इंटरवलनंतर मीराची प्रतिक्रिया पाहून मी हैराण झालो होतो. मला समजलंच नाही की तिला काय झालंय. आमचं लग्न होऊन एकच वर्ष झालं होतं आणि ते एक अरेंज मॅरेज होतं. आम्ही एकमेकांना व्यवस्थित ओळखतही नव्हतो. अशात तिनं मला विचारलं तू खऱ्या आयुष्यातही या भूमिकेसारखाच आहेस का? मला तुझ्यासोबत राहायचं नाही असंही ती म्हणाली. त्यावेळी मी तिला समजावलं की ती फक्त एक भूमिका होती. खऱ्या आयुष्याचा याच्याशी काहीही संबंध नाही.’

आणखी वाचा- रुग्णालयातून घरी आलेल्या मलायकाला भेटायला गेला बॉयफ्रेंड अर्जुन कपूर, व्हिडीओ चर्चेत

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत. शाहिद आणि मीरा यांना मीशा आणि झेन ही दोन मुलं देखील आहेत. बॉलिवूडमध्ये सक्रिय नसतानाही मीराचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहता वर्ग आहे. शाहिदच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याचा ‘जर्सी’ चित्रपट येत्या १४ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
के एल राहुल आणि सुनील शेट्टीमध्ये ‘या’ कारणामुळे उडतात खटके
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी