अभिनेता सुबोध भावे हा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य: एक युगपुरुष’, ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची मोहोर उमटवणारा सुबोध भावे आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार आहे. याचा पहिला लूक नुकताच प्रदर्शित झाला. त्यात सुबोध भावे हा महाराष्ट्रातील एका थोर संताच्या भूमिकेत दिसत आहे.

सुबोध भावेने काही दिवसांपूर्वी त्याच्या आगामी हिंदी चित्रपटाची घोषणा केली होती. संत तुकारामांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात सुबोध हा प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातील सुबोध भावेचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. सुबोधने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबद्दल चाहत्यांना माहिती दिली. सुबोधचा हा नवा लूक पाहून सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : ‘गली बॉय’मधील ‘या’ भूमिकेसाठी सिद्धार्थ मेननला विचारण्यात आलं होतं; मुलाखतीदरम्यान अभिनेत्याचा खुलासा

सामान्य प्रेक्षकच नव्हे तर बरेच सेलिब्रिटीजसुद्धा सुबोधचं कौतुक करताना दिसत आहेत. अभिनेता जितेंद्र जोशी यानेदेखील सुबोध भावेच्या पोस्टवर कॉमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. जितेंद्र जोशीने त्याच्या कॉमेंटमध्ये लिहिलं की, “खूप छान दिसतो आहेस आणि काम तर उत्तमच केलं असणार यात शंका नाही. उत्सुक आहे मित्रा.” जितेंद्र जोशीच्या कॉमेंटला सुबोध भावेने उत्तर दिलं आहे. सुबोध कॉमेंट करत म्हणाला, “मित्रा तुझ्या इतकं नक्की नाही… प्रयत्न केला आहे बस.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
subodh bhave post comment
subodh bhave post comment

जितेंद्र जोशी यानेसुद्धा दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या चित्रपटात संत तुकाराम यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील जितेंद्रचं काम लोकांना प्रचंड आवडलं, वेगवेगळ्या स्तरावर त्याचं कौतुक झालं. सुबोध भावेच्या पोस्टवर जितेंद्र जोशीची कॉमेंट पाहून लोकांनी पुन्हा त्याला ‘संत तुकाराम’ यांच्या रूपात पाहायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली आहे. सुबोध भावेच्या या आगामी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन आदित्य ओम करत आहेत. तर पुरुषोत्तम स्टुडिओज आणि बी गौतम या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.