झी वाहिनीवरील ‘जोधा अकबर’ या मालिकेने प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री परिधी शर्मा हिच्याकडे एक गोड बातमी असल्याचे कळते. पण अशी कोणती बातमी आहे की परिधीला ती लपवण्याची गरज पडतेय. तर तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरचं परिधीच्या घरी एका तान्हुल्याचे आगमन होणार आहे. परिधी गरोदर असल्याचे कळते.
‘जोधा अकबर’ या मालिकेत परिधीने जोधाची मुख्य भूमिका साकारली होती. गरोदर असलेल्या परिधीने ही बातमी प्रसार माध्यमांपासून लपवण्याचा बराच प्रयत्न केला. याच कारणामुळे ती कोणती दुसरी मालिकाही स्वीकारत नव्हती. एकता कपूरच्या एका आगामी मालिकेत परिधी काम करणार असल्याचीही चर्चा होती. पण नंतर तिनेच या चर्चांना पूर्णविराम लावला. परिधीला तिच्या गरोदरपणातील दिवसांचा आनंद लुटायचा होता. त्यामुळे तिने कामापासून दूर राहणे पसंत केले. नुकतीच ती एका पार्टीत दिसली होती. त्यावेळी तिने बरेच फोटो काढले. तेव्हाच परिधी गरोदर असल्याचे वृत्त समोर आले. त्या फोटोंमध्ये तिचे बेबी बम्प दिसून येत होते. मात्र, सर्वांपासून ही गोड बातमी लपवू पाहणा-या परिधीच्या चेह-यावरील तेजाने सर्वांना तिचे हे गुपित कळले. ‘जोधा अकबर’ मालिका बंद झाल्यापासून परिधी कॅमे-यापासून दूर राहू लागली होती. या दरम्यान तिने करण कुंद्राच्या ‘ये कहाँ आ गये हम’ मालिकेत भूमिका साकारली होती. परिधीने चार वर्षांपूर्वी व्यावसायिक तन्मय सक्सेना याच्याशी विवाह केला होता.
परिधी व्यतिरीक्त टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी हीदेखील लवकरच गोड बातमी देणार आहे. श्वेता आणि अभिनव कोहली यांचे हे पहिलेच बाळ असेल. श्वेताला तिच्या पहिल्या पतीपासून एक मुलगी आहे. तसेच, ‘कबूल है’ मालिकेतील अभिनेता करणवीर बोहरा आणि त्याची पत्नी तीजय सिधू हे देखील लग्नाच्या जवळपास १० वर्षानंतर आई-बाबा होणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 10th Sep 2016 रोजी प्रकाशित
.. या अभिनेत्रीने लपवून ठेवलीय ‘गोड बातमी’?
तिच्या चेह-यावरील तेजाने सर्वांना तिचे हे गुपित कळले.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 10-09-2016 at 19:25 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jodha akbar fame paridhi sharma expecting her first child