बॉलीवूडचा एलिजिबल बॅचलर असणा-या जॉन अब्राहमने गुपचुप विवाह केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबतची संपूर्ण माहिती अद्याप मिळालेली नाह. जॉनच्या पत्नीचे नाव प्रिया असे असून, त्याने केलेल्या एका ट्विटवरून जॉनने खासगीरित्या विवाह केल्याचे समजते.
२०१३ साली जॉनचे प्रियाशी प्रेमसंबंध असल्याची चर्चा होती. पण यास जॉन नेहमीच नाकारत होता. मात्र, आता ट्विटरवरून जॉनने आपल्या लग्नाचा बॉम्ब फोडला आहे. त्याने सर्व चाहत्यांना नव्या वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. त्यात त्याने शुभेच्छुक म्हणून जॉन आणि प्रिया अब्राहम असे नाव दिले आहे. जॉन आणि प्रियाची भेट २०१० साली वांद्र्याच्या जीममध्ये झाली होती. जॉनने काही दिवसांपूर्वीच आपण लवकरच लग्न करू असे सांगितले होते. तसेच, या लग्नामध्ये केवळ कुटुंबियांनाच बोलवण्यात येईल असेही तो म्हणाला होता.
Wishing you and your loved ones a blessed 2014! May this year bring you love, good fortune and joy. Love, John and Priya Abraham
— John Abraham (@TheJohnAbraham) January 2, 2014
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.