बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम नेहमीच फिटनेस आणि चित्रपटांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. पण आता वेगळ्याच कारणानं जॉनचं नाव चर्चेत आलं आहे. जॉन अब्राहमच्या इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट अचानक डिलिट झाल्या आहेत. त्यानंतर हे सर्व फोटो जॉननं स्वतः डिलिट केलेत की त्याचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झालंय अशी उलट- सुलट चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे.

तीन दिवसांनंतर म्हणजेच १७ डिसेंबरला जॉन अब्राहमचा वाढदिवस आहे. अशात अचानक त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील सर्व फोटो डिलिट झाल्यानं चाहतेही हैराण झाले आहेत. जॉन अब्राहमचं इन्स्टाग्रामवर अकाउंट हॅक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान जॉन अब्राहमनं अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

जॉनच्या इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलिट झाल्यानंतर एकीकडे असाही अंदाज लावला जात आहे की, अशाप्रकारे सर्व पोस्ट डिलिट करणं त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग असू शकतो. जॉन अब्राहमचा आगामी चित्रपट ‘अॅटॅक’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे जॉनकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नाही तोपर्यत हे सर्व चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जॉनच्या कामाबद्दल बोलायचं तर याआधी त्याचा ‘सत्यमेव जयते २’ हा चित्रपट रिलीज झाला होता. या व्यतिरिक्त तो आगामी काळात ‘अॅटॅक’ आणि ‘पठाण’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.