‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’ चित्रपट अभिनेता जॉनी डेप त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पूर्वाश्रमीची पत्नी अँबर हर्डच्या विरोधात जॉनीने पुन्हा एकदा कोर्टात मानहानीचा अर्ज दाखल होता, त्यामुळे ते दोघेही सातत्याने चर्चेत आहेत. दरम्यान, हा मानहानीचा खटला जॉनी डेपने जिंकला आहे. यासगळ्यात जॉनी डेप आणि त्याची वकिल कॅमिल वास्क्वेझ हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. यावर आता कॅमिलने तिची प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : अँबर हर्डची ११६ कोटीची नुकसान भरपाई जॉनी डेप करणार माफ, पण ‘या’ अटीवर; वकिलांनी केला खुलासा

कॅमिल ही कॅलिफोर्नियास्थित वकिल असून जॉनी डेपच्या खटल्यामुळे ती प्रकाशझोतात आली. तिच्या प्रश्नांमुळे आणि कोर्टातील तिच्या आत्मविश्वासामुळे सोशल मीडियावर ती अनेकांची चाहती झाली. ‘पीपल मॅगझिन’ला दिलेल्या मुलाखतीत कॅमिल म्हणाली, “एखाद्या महिलेनं तिचं काम उत्तम केल्यावर अशा चर्चा होतातच. पण हे खूप निराशाजनक आहे. जॉनी हा माझा खूप चांगला मित्र आहे आणि गेल्या साडेचार वर्षांपासून मी त्याच्यासाठी काम करतेय. त्याच्यासोबतची माझी वागणूक चुकीची आणि अनप्रोफेशनल होती असं काही माध्यमांमध्ये म्हटलं गेलं. मी स्वत: एका रिलेशनशिपमध्ये आहे आणि मी माझ्या बॉयफ्रेंडसोबत आनंदी आहे. एखाद्या वकिलाने त्याच्या क्लाएंटला डेट करणं हे चुकीचं आहे आणि एखाद्याने अशा अफवा पसरवणं हेसुद्धा चुकीचं आहे. हे एखाद्या स्त्रीचा दर्जा कमी केल्यासारखं आहे. कदाचित माझ्या कामामुळे मला अशा गोष्टींना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे या चर्चा जेव्हा होऊ लागल्या तेव्हा मला फारसं आश्चर्य वाटलं नाही.”

आणखी वाचा : अक्षयला होती सासू डिंपल कपाडियासोबत डेटवर जाण्याची इच्छा, कारण…

आणखी वाचा : सासूबाईंचे झाले होते निधन, पण प्रोडक्शनच्या लोकांनी सांगितलं “हसतानाची रिअ‍ॅक्शन देऊन जा”

खटल्यादरम्यान जॉनीशी झालेल्या जवळीकबद्दल ती पुढे म्हणाली, “जॉनी त्याला न्याय मिळण्यासाठी तिथे लढत होता. त्याच्याविरोधात तथ्यहीन आरोप होत असताना त्या व्यक्तीने दररोज कोर्टात येऊन बसलेलं पाहून मला प्रचंड दु:ख व्हायचं, अशा व्यक्तीची मी माझ्या परीने पूर्ण मदत केली. कोर्टात असताना मी त्याला त्याला थोडा आधार देण्याचा प्रयत्न केला. मग त्याचा हात माझ्या हातात घेऊन का होईना. आम्ही त्याला न्याय मिळवून देऊ हे आश्वासन मी जॉनीला देण्याचा प्रयत्न केला.”

आणखी वाचा : चिमुकलीची शिवभक्ती पाहून ऊर भरून येईल! डॉ. अमोल कोल्हेंनी शेअर केला हृदयस्पर्शी व्हिडीओ

आणखी वाचा : ‘द काश्मीर फाइल्स’ची कहाणी खोटी म्हणणाऱ्या नसीरुद्दीन शाहंना, विवेक अग्निहोत्रीने दिले उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॅमिल ही कॅलिफोर्नियास्थित वकील असून जॉनी डेपच्या खटल्यामुळे ती प्रकाशझोतात आली. तिच्या प्रश्नांमुळे आणि कोर्टातील तिच्या आत्मविश्वासामुळे सोशल मीडियावर ती अनेकांची चाहती झाली. जॉनीचा खटला जिंकल्यानंतर तिचं प्रमोशनही करण्यात आलं.