ह्रतिक रोशनचा ‘काबिल’ चित्रपटाने १०० कोटीच्या क्लबमध्ये आपली उप सामिल झाला आहे. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर १०० कोटींचा पल्ला फारच कमी वेळात पार केला. अकराव्या दिवशी चित्रपटाने १०६.२ कोटी इतकी कमाई केली आहे. या चित्रपटाने शनिवारी ९.२२ कोटी इतकी कमाई केली. बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक आणि निर्मात्यांना कोणत्या दोन चित्रपटाची टक्कर ही बॉक्सऑफिसवर फायदेशीर ठरली? असे विचारल्यास कदाचित त्यांच्याकडून ‘काबिल’ आणि ‘रईस’ या चित्रपटाची नावे ऐकायला मिळाली तर नवल वाटणार नाही. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर केलेल्या कमाईचे आकडे हेच चित्र दाखवून देतात. ‘काबिल’ आणि ‘रईस’ हे दोन्ही चित्रपट २५ जानेवारीला एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. ‘रईस’ चित्रपटाने कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केली. या चित्रपटाच्या तुलनेत ‘काबिल’ची कमाई कमी होती. सुरुवातीला दोन्ही चित्रपटांनी जवळपास ३५ ते ४० कोटीची कमाई केली होती. त्यानंतर आता पहिल्या आठवड्याच्या अखेरीस दोन्ही चित्रपटाच्या कमाईचा विचार केल्यास ‘काबिल’ चित्रपटाने शुक्रवारी २ फेब्रुवारीला ५.२५ कोटी आणि शनिवारी ६.४० कोटींची कमाई केली. तर याच दोन दिवसांत ‘रईस’ने या चित्रपटापेक्षा अधिक म्हणजे ६.२५ कोटी आणि ६.६० कोटी गल्ला जमविल्याचे दिसते.
बॉलीवूडमधील बहुचर्चित असे ‘रईस’ आणि ‘काबिल’ हे दोन चित्रपट या आठवड्यात एकाच दिवशी प्रदर्शित झाले. अभिनेता शाहरुख खानची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘रईस’ या चित्रपटाची सध्या चर्चा सुरु आहे. राहुल ढोलकिया दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खानने अवैधरित्या दारुचा धंदा करणाऱ्या एका गुंडाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन, शाहरुखचा अभिनय या महत्त्वाच्या घटकांमुळे ‘रईस’ खऱ्या अर्थाने बॉक्स ऑफिसवरही आपली श्रीमंती सादर करण्यात यशस्वी ठरत असल्याचेच चित्र पाहायला मिळत आहे.
तर, दुसरीकडे हृतिक रोशनचा ‘काबिल’ हा चित्रपट शाहरुखच्या चित्रपटाला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे. शांततेत आयुष्य जगू इच्छिणा-या जोडप्याच्या आयुष्यात अचानक वादळ येते आणि या जोडप्याचे जगचं उध्वस्त करून जाते. येथून सुरू होते, एका सूडाची कहानी. हृतिक रोशने ‘काबिल’मध्ये साकारलेल्या रोहन भटनागरच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक होत आहे. ‘काबिल’ची जास्त प्रशंसा केली गेली असली तरी सध्या कमाईचा आकडेवारीत मागेच आहे.