सध्या देशभरात ‘काली’ माहितीपटाच्या पोस्टरची आणि त्यावरून सुरू असलेल्या वादाची चर्चा आहे. या पोस्टरवर हिंदू देवतेच्या अवतारात एक महिला दिसत आहे. मात्र ही महिला सिगारेट ओढताना दिसत आहे. या पोस्टरवरील या महिलेच्या मागील बाजूस समलैंगिकतेसंदर्भातील सप्तरंगी झेंडाही दिसत आहे. दिग्दर्शक आणि निर्मात्या लीना मणीमेकल या माहितीपटाच्या पोस्टरमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. सोशल मीडियावरून त्यांच्या अटकेची मागणी झाल्यानंतर आता त्यांच्या विरोधात दिल्ली आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पण अशा प्रकारे वादग्रस्त कारणाने चर्चेत असण्याची लीना मणीमेकल यांची ही पहिलीच वेळ नाही.

आपल्या ‘काली’ माहितीपटाच्या पोस्टमुळे चर्चेत असलेल्या लीना मणीमेकल यांचं वादांशी फार जुनं नातं आहे. त्या याआधीही त्यांच्या काही चित्रपटांमुळे आणि खासगी आयुष्यामुळेही वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. वेगवेगळ्या वादग्रस्त कारणांनी चर्चेत राहिलेल्या लीना यांनी आपल्या वैयक्तीक आयुष्यात बराच संघर्ष देखील केला आहे. लीना मणीमेकल या मुळच्या मदुरैच्या दक्षिण भागातील सुदूर या गावातील आहे. त्यांचे वडील एका कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. त्या ज्या गावात राहायच्या तिथे वयात आल्यावर मुलीचं लग्न तिच्या मामासोबत लावून देण्याची प्रथा होती.

आणखी वाचा- Kaali Poster Row : वादग्रस्त पोस्टरमुळे निर्माते अडचणीत, दिल्ली- युपीमध्ये FIR दाखल

लीना यांना जेव्हा या प्रथेबद्दल समजलं तेव्हा त्या त्यांच्या लग्नाआधीच घरातून पळून गेल्या. त्यांनी चेन्नईला जाऊन एका तमिळ मासिकाच्या कार्यालयात नोकरीसाठी अर्ज दिला. पण त्या कार्यालयातील लोकांनी लीना यांच्या घरी संपर्क करून पुन्हा त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवलं. त्यानंतर लीना यांनी घरच्यांना कसंबसं समजावलं आणि आपलं अभियांत्रिकीचं शिक्षण सुरू केलं. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना लीना यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर लीना यांनी वडिलांनी तमिळ दिग्दर्शक पी भारथीराजा यांच्यावर लिहिलेला प्रबंध पुस्तकाच्या स्वरुपात छापण्याचा निर्णय घेतला.

पाहा व्हिडीओ –

वडिलांचं पुस्तक प्रकाशित करण्यासाठी लीना पुन्हा चेन्नईला आल्या. या वेळी त्यांनी पी भारथीराजा यांची भेट घेतली. पण पहिल्या भेटीतच त्या भारथीराजा यांच्या प्रेमात पडल्या. दिग्दर्शक आणि लीना यांच्या अफेअरच्या चर्चा सगळीकडे झाल्या. जेव्हा हे वृत्त लीना यांच्या आईला समजलं तेव्हा त्यांनी मुलगी घरी यावी यासाठी अन्न पाण्याचा त्याग करत उपोषण सुरू केलं. आईची बिघडलेली तब्येत पाहता लीना यांनी चित्रपट आणि भारथीराजा यांना सोडून घरी परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही नोकरी केल्यावर त्यांनी सामाजिक मुद्द्यांवर आवाज उठवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २००२ साली पहिला चित्रपट ‘मथम्मा’वर काम करायला सुरुवात केली आणि मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही.

आणखी वाचा- “नीट वाग आता माझं लग्न झालंय…” भर कार्यक्रमात ओरडली दीपिका पदुकोण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या आपल्या आगामी माहितीपटामुळे वादात असलेल्या लीना मणीमेकल याआधीही याच कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. २०११ साली त्यांनी पहिला माहितीपट ‘सेंगडल’ प्रदर्शित केला. जो धनुष्कोडीच्या मच्छिमारांवर आधारित आहे. लीना यांच्या या माहितीपटावरून बरेच वाद झाले. हा चित्रपट कायदेशीर बाबींमध्ये एवढा अडकला की याच्या प्रदर्शनासाठी बराच वेळ गेला. एवढंच नाही तर सेन्सॉर बोर्डने देखील या चित्रपटाला प्रमाणपत्र देणं नाकारलं. या चित्रपटातून भारतीय आणि श्रीलंकेच्या सरकारवर आपत्तीजनक आणि राजकिय टीका करण्यात आली असल्याचं बोर्डाचं म्हणणं होतं. याशिवाय लीना यांच्या ‘व्हाइट वॅन स्टोरीज’ चित्रपटही वादग्रस्त कारणांनी चर्चेत राहिला होता.