बॉलिवूडच्या चित्रपटांमागे टाकत बॉक्स ऑफिसवर ‘कांतारा’ चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला. मूळ कन्नड चित्रपट असला तर तो आता हिंदी भाषेत डब केला असल्याने प्रेक्षकदेखील हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली होती. हा चित्रपट कर्नाटकातील ‘भूत कोला’ या लोककलेवर आधारित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या नृत्यप्रकाराची सध्या सगळीकडे चर्चा आहे. नुकतीच दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टीने हा नृत्यप्रकार एन्जॉय केला आहे.
अनुष्का शेट्टी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री मानली जाते. अनुष्काने आपल्या जन्मगावी म्हणजे मंगळुरु येथे या नृत्यप्रकाराचा आनंद घेतला. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनुष्काला पाहून तिच्या चाहत्यांना सर्वात जास्त आनंद झाला सुंदर सिल्क साडी नेसलेली अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती.
अनुष्काचा शेवटचा चित्रपट चार वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. अनुष्काने याआधी अनेक सुपरहिट अशा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच ती आता एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटनवरून एक फोटो शेअर केला होता ज्यात तिने शेफ कॅप घातली होती. त्यामुळे चाहत्यांनादेखील या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.