बॉलीवूड अभिनेता कबीर बेदीने चौथ्यांदा संसार थाटला आहे. ७० वर्षीय कबीर बेदीने ४२ वर्षीय परवीन दुसांजसोबत १५ जानेवारीला विवाह केला. १६ जानेवारीला कबीरचा वाढदिवस होता.
मिळालेल्या माहितीनुसार, कबीरच्या बर्थडे पार्टीत येण्याचे आमंत्रण मिळाल्याचे एका उपस्थिताने सांगितले. निमंत्रण पत्रिकेत लिहिलेले होते, कबीर बेदी- परवीन दुसांज तुम्हाला कबीरच्या बर्थडेचे आमंत्रण देत आहेत. सूफी प्रोग्रामसाठी लवकर या. सूफी गाण्यांमध्ये कबीर आणि परवीन लग्नाची घोषणा करणार असल्याची चर्चा होती. या लग्नाला लंडन, अमेरिका, दुबई, मलेशिया आणि यूरोपहून कबीरचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते.
यापूर्वी कबीरने प्रोतिमा, सुसान हम्फ्रेस आणि निक्कीसोबत विवाह केला होता.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jan 2016 रोजी प्रकाशित
७०व्या वाढदिवशी अभिनेता कबीर बेदीने थाटला चौथ्यांदा संसार
७० वर्षीय कबीर बेदीने ४२ वर्षीय परवीन दुसांजसोबत विवाह केला
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 17-01-2016 at 12:52 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kabir bedi ties the knot with parveen dusanj