‘कच्चा बदाम’ हे गाणं आजही कुणी विसरलेलं नाही. त्यावर तयार झालेले असंख्य रिल्स आजही लोक शेअर करतात. अंजली अरोरासारख्या मुलीला या गाण्यावरील एका रीलने सेलिब्रिटी बनवलं. या गाण्याचे खरे मालक म्हणजे भुबन बड्याकार. एका गाण्यामुळे रातोरात स्टार झालेल्या भुवन यांचं आणखी एक गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बंगालमधील रहिवासी असलेले भुबन यांनी एका मुलाखतीत याबद्दल खुलासा केला आहे. ते पुन्हा भुईमूग शेंगा विकणार नाहीत तर ते फक्त गाणी बनवतील आणि लोकांचे मनोरंजन करतील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या गाण्यावर प्रचंड रिल्स बनले, ‘कच्चा बदाम’चे रिमिक्स गाणेही खूप प्रसिद्ध झाले, त्यामुळे भुबनचे आयुष्यच बदलून गेले. कार अपघातामुळे ते काही काळ चर्चेत नसले तरी आता ते एक नवीन अल्बम प्रेक्षकांसमोर आणणार आहे.

आणखी वाचा : “सगळे मला आँटी…” ‘डबल एक्सएल’ चित्रपट पाहून कपिल देव यांच्या पत्नीला आठवले जुने दिवस

‘आज तक’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना भुबनने अल्बमचे नाव सांगितले. अल्बमचं नाव असेल ‘अब मैं मूंगफली नहीं बेचूंगा’, ज्यामध्ये भुबन त्यांच्या खडतर आयुष्याचा प्रवास मांडणार आहेत. त्या एका गाण्याने भुबन यांना सेलिब्रिटी बनवल्याने त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्यंतरी एका अपघातादरम्यान ते या सगळ्यापासून दूर गेले होते. आता मात्र ते पुन्हा त्यांच्या नव्या ढंगात नव्या साच्यात एक नवा कोरा अल्बम घेऊन येणार आहेत. याआधीसुद्धा त्यांचं ‘होबे नाकी बोउ’ हे गाणं चांगलंच व्हायरल झालं होतं. प्रेक्षकांनीही ते डोक्यावर उचलून धरलं होतं. आता नेटकरी त्यांच्या या नव्या अल्बमची आतुरतेने वाट पाहत आहेत.