बॉलिवूडमध्ये आपलं मत रोखठोकपणे मांडणाऱ्या आणि त्या मतांवर ठाम राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजेच कल्कि कोचलीन होय. अनेक बॉलिवूड चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये कल्किने काम केलंय. तिच्या आतापर्यंतच्या करियरमध्ये प्रोफेशनल लाइफपेक्षा जास्त पर्सनल लाइफमुळे ती जास्त चर्चेत आली. अभिनेत्री कल्कि गेल्या वर्षी ७ फेब्रवारीला गोंडस मुलीची आई झाली. अभिनेत्री कल्कि आणि तिचा बॉयफ्रेंड गाय हर्शबर्ग या दोघांची ही मुलगी आहे. पुन्हा एकदा तिने गरोदरपणातले दिवस आठवून अनेक खुलासे उघड केले आहेत. सोबतच गरोरदपणात महिलांना अनेक समस्या असतात, यावर कधीच चर्चा केली जात नाही.

एका माध्यमाशी बोलताना ती म्हणाली, “माझ्या गरोदरपणातल्या दिवसांना आयुष्यातले अविस्मरणीय क्षण म्हणून मी कधीच पाहत नाही. ती एक छोटीसी सुरवात होती. मी अनेकदा पाहिलंय की गरोदरपणात महिलांना होणाऱ्या अनेक समस्यांवर खूप कमी लोक आहेत जे मनमोकळेपणाने बोलतात. आपण फक्त इतंकच ऐकलंय की हा खूप सुखद अनुभव असतो. मुळात हा सुखम अनुभव आहेच. परंतू या दरम्यान गरोदर महिलेमध्ये शारीरिक आणि मानसिक परिवर्तन घडून येतात, हे ही पाहणं गरजेचं आहे. लोक असं समजतात की जर तुम्ही आई बनण्याचा कडू अनुभव सांगितला तर तो अनुभव तुम्हाला तुमच्या बाळापासून दूर करू शकतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kalki (@kalkikanmani)

अभिनेत्री कल्कि पुढे म्हणाली, ” या सगळ्यांची सुरवात जेव्हा मला उलट्या सुरू झाल्या तेव्हापासून झाली. अचानक माझ्यातली सगळी उर्जा संपल्यासारखं वाटू लागलं. यादरम्यान मला कोणताच विचार सुद्धा करता येत नव्हता. इकतंच काय तर मला माझ्या स्वतःच्या शरिराची चीड येऊ लागली होती. कारण मला खूप थकवा जाणव होता. मी कोणतंच काम करू शकत नव्हती.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kalki (@kalkikanmani)

यावेळी तिने तिच्या डिप्रेशनबद्दलही सांगितलं. यावेळी ती म्हणाली, “मी पोस्टपार्टम डिप्रेशनचा (बाळाला जन्म दिल्यानंतरचं डिप्रेशन) सामना केलेला आहे. याला थकवा असं म्हणता येणार नाही. जेव्हा व्यक्तीला प्रत्येक दोन तासांनी जाग येत असेल, तसंच पूर्ण रात्र आणि दिवसा जागत राहत असेल तर तो डिप्रेशनमध्ये असतो. झोप न येणं हे खूप त्रासदायक असतं. या समस्येवर लोकं मनमोकळ्यापणाने बोलत नाहीत.”