गेल्या काही दिवसांपासून चौकटीबाहेरील भूमिका साकारणारी अभिनेत्री आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपची पूर्वपत्नी अभिनेत्री कल्कि कोचलिन चर्चेत आहे. अनुरागसह झालेल्या घटस्फोटानंतर कल्कि बरेच दिवस सिंगल होती. काही दिवसांपूर्वीच बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गसोबतचा फोटो कल्कीने सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या रिलेशनशीपची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर ती प्रेग्नंट असल्याचे समोर आले. नुकताच कल्किने लग्नाआधी प्रेग्नंट असल्यामुळे तिच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया कशी होती याचा खुलासा केला आहे.
कल्किने करिना कपूरचा रेडिओ शो ‘वॉट वुमन वॉन्ट’मध्ये हजेरी लावली होती. शोमध्ये तिने तिच्या प्रेग्नंसीशी संबंधीत अनेक गोष्टींची खुलासा केला. ‘माझ्या आणि गायच्या घरातले परंपरांचा जास्त विचार करत नाहीत. त्यामुळे दोघांचेही कुटुंबीय आनंदी आहेत. माझी आई मला म्हणाली की, “पुढच्या वेळी तू लग्न करशील तेव्हा विचारपूर्वक निर्णय घे. हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे.” माझा एकदा घटस्पोट झाल्यामुळे काळजी पोटी ती असं म्हणाली’ असा खुलासा कल्किने केला.
कल्कि आणि अनुराग यांचे २०११ मध्ये लग्न झाले होते. या दोघांनी बऱ्याच चित्रपटांसाठी एकत्र काम केले. अखेर २०१५ मध्ये या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र घटस्फोटानंतरही ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत.
कल्किने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत आई होणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान कल्किने वॉटर बर्थद्वारे बाळाला जन्म देण्याचा प्लॅन केला असल्याचे देखील सांगितले आहे. कल्कि आणि गायने त्यांच्या मुलाचे नाव देखील ठरवून ठेवले आहे.