बॉलिवूड अभिनेता आमिर खानवर वैयक्तिक टिप्पणी केल्यानंतर स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खानचं ट्विटर अकाऊंट काही काळासाठी बंद करण्यात आलं. अशाप्रकारे केआरकेचं ट्विटर अकाऊंट बंद करण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यामुळे आता ट्विटरविरोधात कोर्टात जाणार असल्याचं त्याने म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षीसुद्धा दिवाळीतच अजय देवगणच्या ‘शिवाय’ या चित्रपटाचं समीक्षण चुकीच्या पद्धतीने दिल्याने केआरकेचं ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आलं होतं. ‘ट्विटरवर ६० लाख फॉलोअर्स मिळवण्यासाठी गेल्या ४ वर्षांपासून मी मेहनत घेतली आहे आणि बराच पैसा खर्च केला होता. मी ट्विटरविरोधात कोर्टात जाणार आणि आतापर्यंत मी माझ्या ट्विटर अकाऊंटसाठी जो काही पैसा आणि वेळ खर्च केला आहे त्याचा परतावा करण्याची मागणी करणार,’ असं तो म्हणाला.

वाचा : गेल्या २४ वर्षांत दिवाळीत कधीही फ्लॉप झाला नाही शाहरुख खान

यासंदर्भात त्याने फेसबुक पोस्टद्वारेही राग व्यक्त केला होता. त्याने लिहिलं की, ‘मी कोणाला शिवीगाळ केली नाही ना धमकी दिली. साठ लाख फॉलोअर्सचं माझं अकाऊंट अशाप्रकारे कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्याचा अधिकार ट्विटरला नाही.’ आमिर खानच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाचं समीक्षण ट्विटरवर मांडल्यानंतर केआरकेचं अकाऊंट बंद करण्यात आलं होतं. या समीक्षणात त्याने चित्रपटाचा शेवट उघड केल्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamaal r khan said he will go to court against twitter
First published on: 20-10-2017 at 14:58 IST