दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन आज ६८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९५४ रोजी परमकुडी, चेन्नई येथे झाला होता. वयाच्या ६ व्या वर्षीच त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर तारुण्यात त्यांनी ‘अपूर्व रागंगल’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली ज्यातील त्यांच्या अभिनयाचं जोरदार कौतुक झालं. हा चित्रपट एका बोल्ड विषयावर आधारित होता. त्यानंतर त्यांनी वेगवेळ्या भूमिका साकारल्या. पण अनेकदा आपल्या करिअरबरोबरच ते खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिले होते. त्यांनी एकदा अभिनेत्री रेखा यांना जबरदस्तीने किस केलं होतं.

कमल हासन एक उत्तम कलाकार आहेत. पण त्यांच्या कामाबरोबरच ते खासगी आयुष्य, अफेअर, लग्न, घटस्फोट या कारणांनी अनेकदा चर्चेत राहिले आहेत. १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुन्नागई मन्नन’ चित्रपटाचा एक सीन शूट करत असतानाही असंच काहीसं घडलं होतं. ज्यामुळे कमल हासन खूप चर्चेत आले होते. एवढंच नाही तर त्यांचा हा किस्सा आजही चर्चेत आहे. कमल हासन यांनी या चित्रपटाचा एक सीन शूट करत असताना अभिनेत्री रेखा यांना किस केलं होतं. पण या बॉलिवूड नाही तर तमिळ अभिनेत्री रेखा होत्या. त्याचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता आणि त्यानंतर रेखा यांनी यावर स्पष्टीकरण दिलं होतं.

आणखी वाचा- “चोल राजाच्या काळात हिंदू धर्म…”, कमल हसन यांनी केले दिग्दर्शक वेत्रीमारन यांच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानाचे समर्थन!

रेखा यांनी या सीनबद्दल बोलताना, कमल हासन यांनी या सीनच्या वेळी जे काही केलं त्याबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हती आणि त्यावेळी त्या घाबरल्या होत्या असं म्हटलं होतं. याबाबत त्यांनी त्यावेळी दिग्दर्शकांकडेही तक्रार केली होती. एका मुलाखतीत तमिळ अभिनेत्री रेखा यांनी या लिपलॉक सीनबाबत आपल्याला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती असं म्हटलं होतं. त्या म्हणाल्या, “मला याबाबत काहीच माहीत नव्हतं आणि जेव्हा मी दिग्दर्शक सुरेश कृष्णा आणि वसंत यांच्याकडे याची तक्रार केली तेव्हा त्यांनी हसत हसत मला सांगितलं की, तू असं समज की एका मोठ्या राजाने एका लहान मुलाचं चुंबन घेतलं आहे.”

आणखी वाचा- कमल हासन यांचा मोठा खुलासा; म्हणाले “या सुपरस्टारला घेऊन मला ‘पोन्नियिन सेलवन’ हा चित्रपट करायचा होता पण…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अशाप्रकार वयाने लहान असलेल्या अभिनेत्रीला जबरदस्तीने किस करणाऱ्या कमल हासन यांचं रील नाही रिअल लाइफही खूप चर्चेत राहिलं आहे. कमल हासन यांचे आयुष्यात ५ महिलांशी खूप जवळचे संबंध होते. काही रिपोर्ट्सच्या माहितीनुसार यापैकी तिघींशी त्यांची अफेअर्स होती आणि दोघींशी त्यांनी लग्नही केलं. अभिनेत्री श्रीविद्याशी त्यांच्या रिलेशनशिपच्या जोरदार चर्चा झाल्या होत्या. दोघांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.