दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता कमल हसन यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ते फक्त अभिनेतेच नाही तर एक दिग्दर्शक व लेखकसुद्धा आहेत. ‘चाची ४२०’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट आहे. आजवर त्यांनी तामिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी या भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे; तर कमल हसन यांच्यासह श्रृती हसन व अक्षरा हसन या त्यांच्या दोन्ही मुलीसुद्धा अभिनयक्षेत्रात सक्रिय आहेत.

कमल हसन लवकरच ‘ठग लाइफ’ या त्यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहेत. अशातच नुकतीच त्यांनी ‘द हॉलीवूड रिपोर्टर इंडिया’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. यामध्ये त्यांनी त्यांचे गुरु के. बालचंदर यांच्याबद्दल बोलत असताना हा किस्सा सांगितला. ते म्हणाले, “माझ्या आईला वाटायचं की मी काहीच करत नाही, फक्त जेवतो आणि सिनेमे बघतो; त्यामुळे माझ्या आईला मी काम करू शकतो हे दाखवण्याकरिता मी न्हावी म्हणून काम केलं.”

“के. बालचंदर यांच्या सलोनमध्ये काम केलं. त्यांनी मला न्हावी काम शिकवलं, ते स्वत: एक न्हावी होते.” के. बालचंदर हे प्रसिद्ध चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक व अभिनेते होते. केवळ कमल हसनच नव्हे तर ते दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत व बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवींचेही गुरू होते. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.

पुढे के. बालचंदर यांच्याबद्दल बोलताना कमल हसन म्हणाले, “त्यांनासुद्धा माझा हा किस्सा खूप आवडला होता, म्हणून त्यांनी ‘जरा सी जिंदगी’ या चित्रपटातील क्लायमॅक्समध्ये तो वापरला होता.” पुढे ते म्हणाले, “मी १९ वर्षांचा असताना के. बालचंदर यांना मला दिग्दर्शक व्हायचं आहे असं सांगितलं होतं. परंतु, त्यांनी मला दिग्दर्शक न होता तुझ्यात अभिनयकौशल्य आहे, असं म्हणत मला अभिनेता होण्याचा सल्ला दिला होता.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कमल हसन यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी आजवर ‘पोनियिन सेल्वन: १’, ‘कल्की २८९८ ए.डी.’, लीओ,’ ‘विक्रम,’ ‘मुंबई एक्स्प्रेस,’ ‘गुना,’ ‘सत्या,’ ‘सदमा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे; तर त्यांचा ‘ठग लाइफ’ हा चित्रपट येत्या ४ जूनला प्रदर्शित होणार आहे.