बर्थडे गर्ल कंगना रणौतच्या ‘थलायवी’ सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झालाय. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमामुळे कंगना चांगलीच चर्चेत आली आहे. कंगनाने आतापर्यंत या सिनेमाच्या सेटवरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कंगना रणौतने म्हंटलं कि क्वीन, गँगस्टर आणि तनु वेड्स मनु यांसारख्या सिनेमांमधील तिच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांची आठवण होते. यासारख्या सिनेमांमधून कंगनाने तिचं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे. येत्या काळात येणाऱ्या सिनेमांमधूनही प्रत्येक भूमिकेत कंगनाचं वेगळेपण पाहायला मिळणार आहे.

कंगनाच्या ‘थलायवी’ या सिनेमातील तिच्या भूमिकेची झलक आज प्रेक्षकांना पाहता आली . त्याचसोबत तिच्या आगामी सिनेमांविषयी जाणून घेऊया.

धाकड
रजनीश घई दिग्दर्शित धाकड सिनेमात कंगनाचा अ‍ॅक्शन अंदाज पाहायला मिळणार आहे. या सिनेमात कंगना एक स्पेशल एजंट अग्निची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी असेल असं म्हणत धाकड सिनेमा करिअरमधील महत्वाचा भाग असल्याचं कंगना म्हणाली होती.

(कंगनाचा धाडकमधूल लूक)

“धाकड सिनेमा केवळ माझ्या आयुष्यातील महत्वाचा सिनेमा नसून भारतीय सिनेसृष्टीसाठीदेखील महत्वचा ठरणार आहे. या सिनेमाचा आवाका मोठा असून एखाद्या अभिनेत्रीचा पहिला अ‍ॅक्शन सिनेमा असेल.” असं कंगना म्हणाली होती. १ ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार असून यात दिव्या दत्ता, अर्जुन रामपाल महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

तेजस
कंगनाचे येत्या काळात येणारे सिनेमादेखील स्त्री केंद्रीत असल्याचं दिसून येतंय. ‘तेजस’ सिनेमात कंगना ‘तेजस’ या लढाऊ विमानाच्या वैमानिकाची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमांच पोस्टर रिलीज झालं असून या पोस्टरमध्ये कंगना फायटर वैमानिकाच्या पोशाखात दिसत आहे. ‘तेजस’चे दिग्दर्शन प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक सर्वेश मेवरा करत आहेत. तर निर्मितीची जबाबदारी रॉनी स्क्रूवाला यांनी स्विकारली आहे.

(तेजसमध्ये कंगना साकारणार वैमानिकाची भूमिका)

“गेल्या अनेक वर्षांपासून मला भारतीय सैन्यावर आधारित चित्रपटामध्ये काम करण्याची इच्छा होती. मात्र अशा प्रकारचा कुठलाही चित्रपट अद्याप माझ्या वाट्याला आलेला नव्हता. परंतु ‘तेजस’ या चित्रपटामुळे माझी ती इच्छा पूर्ण झाली. आम्ही या चित्रपटावर जीव तोडून मेहनत करतोय.” असं कंगना म्हणाली. ‘तेसज’ येत्या जुलै महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित सिनेमा
साई कबीर यांच्या एका सिनेमात कंगना इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र कंगनाने या बातमीला दुजोरा दिला आहे. या सिनेमा इंदिरा गांधी यांची बायोपिक नसून यात फक्त इंदिरा गांधीचा काळ आणि काही प्रसंग दाखवण्यात आले आहे. ऑपरेशन ब्लू स्टार आणि त्याकाळातील राजकिय परिस्थितीचं दर्शन या सिनेमातून घडणार आहे.

‘मणिकर्णिका रिटर्न्स : दि लिजेंड ऑफ दिद्दा’

हा सिनेमा काश्मिरमधील राणी दिद्दा यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. दिद्या या काश्मिर खोऱ्यातील पहिल्या महिला राणी होत्या. हा सिनेमा 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘मणिकर्णिका’ सिनेमाचा पहिला भाग हा राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्यकथेवर आधारित होता. निर्माती म्हणून कंगनाचा हा पहिलाच सिनेमा होता.

 

थलायवी
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिताच्या यांच्या आयुष्यावर आधारित थलायवी सिनेमात कंगना जयललीता यांत्या भूमिकेत झळकणार आहे. आजचं कंगनाच्या वाढदिवसाचं निमित्त साधत या सिनेमाच ट्रेरल रिलीज झाला आहे. या भूमिकेसाठी कंगनाला २० किलो वजन वाढवावे लागलं होत.

 

येत्या २३ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन ए.एल.विजय यांनी केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut in her upcoming thalaivi dhakad tejas manikarnika film as lead roll kpw
First published on: 23-03-2021 at 14:06 IST