प्रसिद्ध शिल्पकार सुदर्शन साहू, लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, सामाजिक कार्यकर्त्यां आणि ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्यासह अन्य मान्यवर व्यक्तींना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात मंगळवारी पद्म पुरस्कार प्रदान केले. मंगळवारी पुरस्कार प्रदान सोहळ्याचा दुसरा टप्पा पार पडला. यावेळी सामन्यांमधील असामान्यांचाही पद्म पुरस्काराने गौरव करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात कर्नाटकच्या मनजम्मा जोगती यांचा समावेश होता. मनजम्मा या पहिल्या तृतीयपंथी आहेत, ज्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.

मनजम्मा यांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे अनेकांनी यावर प्रश्न उभा केला. काही नेटकऱ्यांनी दावा केला आहे की सरकार ही LGBTQ समुदायाच्या सदस्यांचा स्वत: च्या फायद्यासाठी प्यादा म्हणून वापर करत आहे. त्यात आता बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने स्वत: च मत स्पष्टपणे मांडलं आहे.

मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
Draupadi murmu
भाजपाकडून पुन्हा राष्ट्रपतींचा अवमान? सोशल मीडियावर ‘तो’ फोटो व्हायरल; विरोधकांच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर!
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान

आणखी वाचा : ‘टिप टिप बरसा पाणी’ गाण्याच्या रिमेकमध्ये कतरिनाला पाहून रवीना म्हणाली…

कंगना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत मनजम्मा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत केल्यानंतर सरकारला होणाऱ्या टिकेवर उत्तर दिले आहे. “राष्ट्रवाद हा लिंग आणि धर्म दाखवत नाही. हे एखाद्या व्यक्तीचा प्रामाणिकपणा आणि चारित्र्याबद्दल आहे”, असे कंगना म्हणाली आहे.

आणखी वाचा : “आपण हिंदू की मुस्लीम?” आर्यन, सुहानाच्या प्रश्नावर शाहरुखने दिले होते ‘हे’ उत्तर

आणखी वाचा : क्रांती रेडकर राहत असलेल आलिशान घर आतुन पाहिलत का?

भारतरत्न, पद्मविभूषण आणि पद्मभूषण यांच्यानंतर पद्मश्री हा भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. यंदा तब्बल १० जणांना पद्मभूषण पुरस्कार, १०२ व्यक्तींना पद्मश्री आणि सात जणांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या सर्व कलाकारांचा पुरस्कार देऊन गौरव केला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते.