scorecardresearch

‘टिप टिप बरसा पानी’ गाण्याच्या रिमेकमध्ये कतरिनाला पाहून रवीना म्हणाली…

‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

raveena tandon, akshay kumar, katrina kaif,
'सूर्यवंशी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ चित्रपट प्रदर्शित झाला असून चित्रपटाची सध्या चर्चा सुरु आहे. अशात या चित्रपटातलं ‘टिप टिप बरसा पानी’ हे रिमिक्स गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. कतरिनाचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. या गाण्यावर प्रेक्षक त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. तर काही लोक आहेत जे या गाण्याची तुलना ही मोहरा या चित्रपटातलं ओरिजनल गाणं ‘टिप टिप बरसा’ या गाण्याशी करत आहेत.

‘सूर्यवंशी’ या चित्रपटातलं ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणं अक्षय कुमार आणि रवीना टंडनच्या ‘मोहरा’ या चित्रपटातलं रिमेक गाणं आहे. ९०च्या दशकात हे गाणं प्रचंड लोकप्रिय गाणं ठरलं आहे. याच कारणामुळे नेटकरी कतरिना आणि रवीनामध्ये तुलना होतं आहे.

आणखी वाचा : क्रांती रेडकर राहत असलेल आलिशान घर आतुन पाहिलत का?

आणखी वाचा : “आपण हिंदू की मुस्लीम?” आर्यन, सुहानाच्या प्रश्नावर शाहरुखने दिले होते ‘हे’ उत्तर

या गाण्याची कोरिओग्राफर फराह खानने रवीनाने हे गाणं पहिल्यांदा जेव्हा पाहिलं तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती हे सांगितलं आहे. हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर रवीनाची प्रतिक्रिया कशी होती हे सांगितलं आहे. हे गाणं पाहिल्यानंतर रवीनाने फराहला फोन केला आहे. इंडिया टुडेशी बोलताना फराहने हे सांगितलं. ‘रवीना ही पहिली व्यक्ती होती, जिने मला फोन करून गाण्याचे कौतुक केले. ती म्हणाली की गाणं खूप चांगलं आहे आणि कतरिना खूप छान दिसत आहे,’ असे फराह म्हणाली.

आणखी वाचा : “पहिल्याच डेटवर बॉयफ्रेंडने केली शरीरसुखाची मागणी…”, ‘तारक मेहता…’ मालिकेतील अभिनेत्रीने केला खुलासा

‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय आणि कतरिना मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या व्यतिरिक्त रणवीर सिंग आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-11-2021 at 15:36 IST

संबंधित बातम्या