करोनाला हरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना आवाहन केले होते. रविवारी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता फक्त ९ मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे बंद करुन गॅलरीत उभे राहून मेणबत्ती, दिवे, मोबाईलची फ्लॅश लाइट लावून उभे राहा. आपण सर्वजण मिळून करोनाच्या या अंधकाराला मिटवूयात असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले. त्यांच्या या निर्णयाला अनेकांनी पाठिंबा दिला तर अभिनेत्री तापसी पन्नूने खिल्ली उडवली होती. या ट्विटमुळे सोशल मीडियावर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता अभिनेत्री रंगोली चंडेलने तिच्यावर निशाणा साधला आहे.

आता रंगोलीने तापसीच्या ट्विटला उत्तर दिले आहे. रंगोलीने तापसीला बी-ग्रेड अभिनेत्री म्हणत चांगलेच सुनावले आहे. पण तापसीने रंगोलीच्या या ट्विटला अद्याप उत्तर दिलेले नाही.

काय म्हणाली होती तापसी?
अभिनेत्री तापसी पन्नूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर सोशल मीडियावर एक ट्विट केले. या ट्विटमध्ये तिने ‘आता नवा टास्क मिळाला आहे’ असे ट्विट केले होते. पण तिचे हे ट्विट नेटकऱ्यांना फारसे आवडले नव्हते. त्यामुळे तापसीला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका यूजरने “प्रतिक्रिया तर अशी देतेय, जणू कुठे व्यवसाय करत होती. माहित आहे ताई, तू घरीच आहेस आणि त्यामुळे तुला झाडू-लादी पुसावी लागत आहे” असे म्हटले होते.तर दुसऱ्या एका यूजरने “चित्रपट तसेही चालत नाहीत तुझे. एक-दोन टास्क कर. कदाचित या निमित्ताने एखादा फोटो तरी व्हायरल होऊ शकेल” असे म्हटले आहे.

अभिनेत्री रंगोली चंडेल सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती बऱ्याच वेळा बिनधास्तपणे सामाजिक विषयांवर तिचे मत मांडत दिसते. पण अनेकदा तिला ट्रोलिंगचा देखील समाना करावा लागतो. याआधी रंगोलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलेल्या अनुराग कश्यपला देखील चांगलेच सुनावले होते.