Suraj Kumar Accident : कन्नड अभिनेता सूरज कुमार उर्फ ध्रुवणचा भीषण अपघात झाला आहे. म्हैसूर-गुंडलुपेट महामार्गावर शनिवारी झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. बेगूरजवळ झालेल्या अपघातानंतर त्याला म्हैसूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अपघातात २४ वर्षीय सूरजच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती, त्यामुळे त्याचा पाय कापावा लागला आहे.
“तुझा आणि करीना कपूरचा संबंध काय?” अभिनेत्रीचा ‘ढोबळी’ उल्लेख करत अवधूत गुप्ते म्हणाला, “ती माझ्या…”
मीडिया रिपोर्ट्सनुसार, २५ जूनच्या संध्याकाळी तो म्हैसूरहून उटीला दुचाकीवरून जात होता. त्यावेळी त्याने महामार्गावर एका ट्रॅक्टरला ओव्हरटेक केले. दरम्यान, त्याचा तोल बिघडल्याने दुपारी चारच्या सुमारास त्याने एका ट्रकला धडक दिली. या अपघातात सूरजच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्याला तत्काळ म्हैसूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण तरीही ते सूरजचा पाय वाचवू शकले नाहीत. जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना त्याचा उजवा पाय कापण्याचा निर्णय घ्यावा लागला. या प्रकरणावर अभिनेत्याच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
कोकणातील गावी पोहोचला भाऊ कदम, कौलारू घरातील लाकडी फळीवर लिहिलेली ‘ती’ दोन वाक्ये चर्चेत
सूरज हा परवतम्मा राजकुमारचा धाकटा भाऊ आणि एस.ए. श्रीनिवास यांचा मुलगा आहे. चित्रपटात एंट्री घेताना अभिनेत्याने आपले नाव बदलून ध्रुवण ठेवले होते. सूरजने २०१९ मध्ये दिग्दर्शक रघु कोवी यांच्या चित्रपटातून अभिनयसृष्टीत पदार्पण केलं होतं. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी करू शकला नव्हता. त्याचा दुसरा चित्रपटही फ्लॉप झाला होता. अशातच आता त्याचा भयंकर अपघात झाला असून त्याचा पाय कापावा लागल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे चाहते तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.